आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामानंद परिसरातील बिअरबार बंद करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, 500 जणांच्या सह्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामानंदपरिसरातील शास्रीनगर येथील (प्रभाग क्रमांक २८) अनधिकृत बिअर बार बंद करण्यासाठी बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ५०० नागरिकांनी स्वाक्षरी करून या बिअर बारला विरोध दर्शवला.शास्रीनगरातील दाट रहिवासी वस्तीत असलेल्या या बिअर बारमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. बारमधून बाहेर पडणाऱ्या मद्यपींमुळे महिला-मुलींना त्या भागातून ये-जा करणेही अवघड होऊन बसले आहे. 
 
दिवसभर मद्यपी लोकांचा गोंधळ, गोंगाट आणि रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू असल्याने आसपासचे नागरिक वैतागले आहेत. तशातच मंगळवारी रात्री या बारमधून बाहेर पडलेल्या मद्यपी तरुणांमध्ये हाणामारी झाली होती. स्थानिक नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी या अनधिकृत बारविरोधात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमत करून या बारला परवानगी दिल्याचा आरोपही नगरसेविकेने या निवेदनात केला होता. या अनधिकृत बारमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, विजय गेही, प्रा.जीवन अत्तरदे,भाग्यश्री चौधरी, वैशाली पाटील, डॉ. सतीश चौधरी, डॉ. सुरवाडे, अतुलसिंह हाडा, धीरज सोनवणे, दिनेश भंगाळे, वंदना पाटील, रेखा पाटील, बापू कुमावत यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला.