आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी अत्याचार: विराट मूकमोर्चाद्वारे नोंदवला निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कोपर्डी अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण हाेऊनही गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मूकमाेर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच निषेधही करण्यात अाला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात अाले.
 
काेपर्डी घटनेच्या निषेधार्थ सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कांॅग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमाेर्चा काढण्यात अाला. अाकाशवाणी चाैक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात अाला हाेता. यापूर्वीचे राष्ट्रवादीचे अांदाेलन जिल्हाधिकाऱ्यांनी गेट बंद केल्यामुळे गाजले हाेते. याची दखल घेत जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी स्वत: १०.३० वाजता परिसराची पाहणी करत पाेलिसांना गेट बंद करण्याच्या सूचना दिल्या. माेर्चात अालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश देण्यात अाला. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, स्मिता पाटील, अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात अाले. काेपर्डी घटनेला एक वर्ष हाेऊन देखील गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही. अामच्या मागण्या सरकारपर्यंत पाेहचवण्याची विनंती अजित पवार, चित्रा वाघ यांनी केली.
 
अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे शेतकऱ्यांना दिले अाश्वासन : मूकमाेर्चानंतर अजित पवारांसह इतर नेत्यांनी तिसऱ्या रेल्वे लाइनसाठी भूसंपादनासंदर्भात उपाेषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. नशिराबाद, तरसाेद, अासाेदा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमाेल भाव दिला जात अाहे. यासंदर्भात अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असल्याचे अाश्वासन पवार यांनी दिले.
 
पवारांनी घेतली नेत्याची हजेरी : राष्ट्रवादीच्यापक्ष कार्यालयाबाहेर साचलेले पाण्याचे डबके, अस्वच्छता, नियाेजनाचा अभाव, कार्यालयातील बेशिस्त याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
बातम्या आणखी आहेत...