आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे ‘त्या’ जगल्या हलाखीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘त्या’ दोघी पिढीजात घरात अत्यंत हलाखीचे जीवन जगल्या. अध्र्यावर राहिलेल्या संसाराची वेल वाढवताना आयुष्यभर घरोघरी जाऊन लोकांची धुणीभांडी केली; मात्र ‘त्या’ ज्या घरात राहत होत्या त्या घराखाली अर्धा किलो चांदीची नाणी होती, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

रामपेठेतील श्रीराम मंदिराजवळील घराचे मालक आहेत वसंत व सुधाकर सदाशिव वाणी हे दोघे भाऊ! त्यांची या घरातील तिसरी पिढी, ते दोघे आता निवृत्त झालेले आहेत. त्यांचे वडील सदाशिव वाणी यांचे वसंत वाणी हे पाच वर्षांचे असताना निधन झाले. त्यांना साळुंकाबाई व छबाबाई या दोन आई होत्या. वडिलांचे अकाली निधन व त्यातच घरची हलाखीची परिस्थिती. त्यामुळे मुलांचे संगोपन कसे करायचे? हा मोठा प्रश्न ‘त्या’ दोघींना पडला. त्यांनी सुरुवातीला काही व्यवसाय करून पाहिला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. नंतर त्यांनी घरोघरी जाऊन धुणीभांडी करायला सुरुवात केली. आयुष्यभर धुणीभांडी करून त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले व दोघा मुलांना मुंबईत नोकरीला लावले. त्यांनी त्यांना तेथेच चांगले संस्कार दिले; त्यांनी मात्र पुन्हा जळगाव गाठले.