आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सिमी’च्या संशयितांना ८० प्रश्न, उत्तर एकच ‘अाय डाेंट नाे’!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘सिमी’ कारवायांच्या खटल्यातील दाेन संशयितांचे जबाब नाेंदविण्याचे काम १६ नाेव्हेंबरपासून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात काम सुरू अाहे. मात्र साेमवारी पाचव्या दिवशीही दाेन्ही संशयितांना विचारलेल्या सर्व प्रश्नांना नकारार्थी उत्तर दिले. अातापर्यंत विचारलेल्या ८० प्रश्नांचे उत्तर दाेन्ही संशयितांनी ‘अाय डाेंट नाे’ एवढेच उत्तर दिले.

सिमी प्रकरणातील संशयित आरोपी अासिफ खान बशीर खान (वय ४४) हा सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणी शिक्षा भोगत आहे. साेमवारी या प्रकरणी न्यायाधीश पटणी यांनी न्यायालयात दाखल पुरावे अाणि ११ साक्षीदारांच्या साक्षीसंदर्भात अासीफ याला १५ प्रश्न विचारले. तर दुसरा संशयित परवेज खान यालाही तेवढेच प्रश्न विचारले. मात्र दाेघांनी माहित नसल्याचेच उत्तर दिले. न्यायाधीश पटणी यांनी संशयीत अासिफ याला अातापर्यंत ४७ साक्षीदारांचे ८० अाणि परवेज याला ८२ प्रश्न विचारले अाहेत. मात्र दाेघांनी सर्व प्रश्नाची उत्तरे माहीत नसल्याचेच दिले अाहेत. या प्रकरणात एकूण ५२ साक्षीदार अाहेत. अाता उर्वरीत ५ साक्षीदारांचे प्रश्न मंगळवारी विचारले जाणार अाहेत. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.
बातम्या आणखी आहेत...