आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नातील बडेजाव बंद होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लग्नासह विविध समारंभाचा भपकेबाजपणा, उत्सवी स्वरूप कमी करणे, अन्नाची नासाडी यासारख्या चुकीच्या पद्धतीला तिलांजली देण्याचा ऐतिहासिक निर्णय रविवारी उबावडो बहावलपूर सिंधी पंचायतच्या आमसभेत झाला. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी समाजातील ८४० कुंटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येऊन मते जाणून घेण्यात आली होती. त्यात ९० टक्के समाजबांधवांनी सध्याच्या पद्धतीत बदल करण्यास सहमती दर्शवली आहे.

लग्न समारंभातील उत्सवी स्वरुपावर श्रीमंती ठरवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत प्रचलित झाले आहेत. मात्र, भपकेबाजपणाबाबत सिंधी पंचायतीतर्फे चिंतन करण्यात आले. याबाबत धुलीवंदनाच्या दिवशी पंचायतीची सभा झाली. या सभेत समारंभांमधील खाद्यपदार्थांच्या स्पर्धात्मकतेमुळे होणारी अन्नाची नासाडी, डीजेवरील नृत्य प्रकार, आतषबाजी याबाबत समाजबांधवांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आदर्श निर्णय इतरही समजांना अनुकरणीय आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जनजागृती अभियानांतर्गत एक प्रश्नावली तयार करून ८४० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी संत हरदासरामबाबा मंगल कार्यालयात उबावडो बहावलपूर सिंधी पंचायतीची आमसभा झाली. अध्यक्षस्थानी हिरानंद मंधवाणी होते. या वेळी अशोक मंधान, विनशनदास मतानी, किशनचंद रावलानी, प्रकाश अडवाणी, घनश्यामदास रावलानी, गुरुमुख तलरेजा, भगत बालाणी, इतर शहरांमधून आलेले सिंधी पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

संकल्पना इतर शहरांतही राबवणार
जळगावसिंधी पंचायतीच्या आजच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा मनोदय बिलासपूर, धुळे, सिल्लाेड, अकोला, चाळीसगाव, गेवराई, औरंगाबाद, अमरावती, जालना येथून आलेल्या सिंधी पंचायतीच्या सदस्यांनी कार्यक्रमात व्यक्त केला.

एका लग्नात ते लाखांची बचत
श्रीमंत व्यक्तींच्या कुटुंबात लग्नाचा खर्च कमीत कमी ३० ते ४० लाखांच्या घरात असतो. मध्यमवर्गीयांच्या लग्नाचा खर्च १० ते २० लाख असतो. त्यामध्ये डीजे, आतषबाजीला फाटा देत खाद्यपदार्थांचे प्रकार ६० ते १०० वरून ३३ पर्यंत कमी केल्यास मोठा खर्च वाचणार आहे. श्रीमंतांच्या लग्नात सुमारे आठ लाख आणि मध्यमवर्गीयांच्या लग्नात लाख वाचणार असल्याचे अशोक मंधान यांनी सांगितले. समाजात वर्षभरात १०० ते १५० लग्न समारंभ पार पाडतात. त्या अनुषंगाने सर्व समाजबांधवांनी या निर्णयाचे अनुकरण केल्यास कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. सर्वेक्षणात ८५ टक्के समाजबांधवांनी पदार्थांची संख्या कमी करण्याबाबत सहमती दर्शवली असून केवळ १० टक्के लोकांनी या निर्णयाला असहमती दर्शवली आहे.

कार्यक्रमांना उशीर झाल्यास दंड आकारावा
कार्यक्रमांनानियोजित वेळेपेक्षा ३० मिनिटे उशिराची सवलत असावी, असे ८४% लोकांना वाटते. मात्र, वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात यावा, असे ८७% बांधवांना वाटते. ५१% ११०० रुपये तर ३७% उत्तरदाते २१०० रुपये दंड आकारण्याच्या बाजूने आहेत. ४% लोक तटस्थ आहेत.

आता समारंभात ३३ प्रकारचे खाद्यपदार्थ
सिंधीसमाजाच्या लग्न इतर समारंभांत सकाळच्या नाश्त्यात २० ते २५, दुपारचे जेवण ३० ते ४० आणि रात्रीच्या जेवणात ६० ते १०० प्रकारचे खाद्यपदार्थ असतात. आता नवीन बदलानुसार सकाळचा नाश्ता ७, दुपारचे जेवण ११ आणि रात्रीच्या जेवणात १५ पदार्थांचे प्रकार राहतील.