आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधी कॉलनी परिसरात घरफोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातघरफोडींचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवारी रात्री सिंधी कॉलनी परिसरातील देविदास कॉलनीत घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी १५ ते २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
देविदास कॉलनीतील श्यामकांत जगताप आयकर विभागात नोकरीला असून त्यांची बदली धुळे येथे झाली आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याने दोन दिवसांपासून त्यांचे कुटुंबीय दवाखान्यात होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी घराचे कुलूप तोडून १५ ते २० हजार रुपयांची रोकड आणि एलसीडी टीव्ही चोरून नेला. बुधवारी सकाळी पाणी भरायला आलेल्या गवळीला घराचे चॅनल गेट उघडे असल्याचे दिसले. समोरच राहणारे त्यांचे नातेवाईक विवेक जगताप यांनी घरात पाहणी केली असता कुलूप बाहेर तोडलेले दिसून आले. यासंदर्भात एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला.