आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साहेब, अाता अाम्हाला सुधरायचयं’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पोलिसासमोर माफी मागतांना आरोपी )
जळगाव- शहरातील गुन्हेगारीचा उंचावलेला अालेख खाली अाणण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पाेलिस प्रशासन प्रयत्‍न अाहेत. त्यासाठी बुधवारी शहरातील सहा पाेलिस ठाण्यातील ५७ हिस्ट्रीशीटर्सला पाेलिस मुख्यालयातील मंगलम सभागृहात चाैकशीसाठी बाेलावले हाेते. १७ हिस्ट्रीशीटर्स चाैकशीला हजर हाेते. त्यापैकी अनेकांनी ‘साहेब, अाम्ही सर्व साेडले, अाम्हाला अाता सुधरायचयं’ अशी विनंती केली.
शहरातील गुन्हेगारी कमी हाेण्यासाठी पाेलिसांनी सराईत गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली अाहे. यात बुधवारी शहरातील सहा पाेलिस ठाण्यात ५७ हिस्ट्रीशीटर्सला चाैकशीसाठी बाेलावले हाेते. यापैकी १७ जण बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मंगलम् सभागृहात हजर झाले हाेते. यात नगरसेवक, राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही हाेते. एरवी शहरात दहशत माजवणारे पाेलिस अधीक्षकांसमाेर पादत्राणे काढून हात जाेडून अगदी शहाण्यासारखे उभे हाेते.
यांची होती उपस्थिती
जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील, एलसीबीचे पाेलिस निरीक्षक प्रभाकर रायते, बी. के. कंजे, अात्माराम प्रधान, नवलनाथ तांबे, श्याम तरवाडकर, सूर्यकांत पाटील अाणि सहायक पाेलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण उपस्थित हाेते.

पाेलिस मुख्यालयात बाेलवण्यात अालेले हिस्ट्रीशीटर्स. तर दुसऱ्या छायाचित्रात हिस्ट्रीशीटरची चाैकशी करताना पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर. शेजारी अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, माेक्षदा पाटील.

एसपींनी काय दिले अादेश
हिस्ट्रीशीटरसध्या काय करतात. यासंदर्भात पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. मात्र, ते प्रत्यक्षात काय करतात. याची माहिती संबंधित पाेलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना घेण्यास सांगितली अाहे. त्यांच्यावर कायम लक्ष ठेवण्याचेही अादेश दिले. तसेच पुन्हा गुन्हे करीत असतील तर त्यांच्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
प्रभारीअधिकाऱ्यांवर वरिष्ठ नाराज
काहीपाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांसदर्भात माहिती नसल्याने वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. याच्यानंतर येताना सर्व गुन्हेगारांची पूर्ण माहिती साेबत अाणण्याचे अादेश दिले.

काय गुन्हे दाखल अाहेत
चाैकशीसाठीअालेल्या हिस्ट्रीशीटर्सवर खून, दराेडे, जबरी चाेरी, घरफाेडी, हाणामारी, जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण, अार्म अॅक्ट, खिसे कापू, जातीय तणाव निर्माण करणे, अॅट्राॅसिटी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेले तसेच एक एमपीडीए कारवाई झालेला गुन्हेगारही हाेता.
कायकरताहेत हिस्ट्रीशीटर

पाेलिसांनीबाेलावलेल्या या हिस्ट्रीशीटर्सपैकी अनेकजण मजुरी करतात, रिक्षा चालवतात, शेती करतात, काही हाॅटेलचा व्यवसाय करतात, काही रेतीचा व्यवसाय करतात.

काय केली चाैकशी
अालेल्यािहस्ट्रीशीटर्सवर किती गुन्हे दाखल अाहेत, शेवटचा गुन्हा कधी दाखल झाला, सध्या ताे काय काम करताे, काेणकाेणत्या पाेलिस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल अाहेत. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असतानाही पाेलिस ठाण्यावर बेकायदा गर्दी का जमवतात, असे अनेक प्रश्न डाॅ. सुपेकर, ठाकूर अाणि माेक्षदा पाटील यांनी विचारले. काहींवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्याचे लक्षात अाल्यावर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
गुन्हेगारांवर याेग्य कारवाई करण्याचे अादेश दिले अाहेत. गुन्हेगारांची काेणत्याही पद्धतीची गय केली जाणार नाही. हिस्ट्रीशीटर्सवर तर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या अाहेत. डाॅ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पाेलिस अधीक्षक