आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदानीत बुडून बहीण, भावाचा कजगावात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कजगाव - येथील गाेंडगाव शिवारातील स्टाेन क्रेशर खदानीत हातपाय धुण्यासाठी गेलेल्या भाऊ-बहिणीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली. शिवराम केशव पाटील (वय ११) अारती केशव पाटील (वय १०, रा.गाेंडगाव) अशी मयतांची नावे अाहेत.
शाळेतून अाल्यावर दाेेघे भाऊ-बहीण बकऱ्या चारण्यासाठी खदानीकडे गेले हाेते. हातपाय धुण्यासाठी ते खदानीत उतरले. पाय घसरून दाेघेही पाण्यात बुडाले. जवळ काेणीही नसल्याने तसेच खदानीपासून वस्ती लांब असल्याने या मुलांनी स्वत:च्या बचावासाठी दिलेला अावाज काेणाच्याही कानावर पडला नाही. त्यामुळे त्यांंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बकऱ्या चारत असताना मुले दिसली नाहीत म्हणून शिवराम अारतीचे काका पुढे अाले. त्यांनी खदानीत वाकून पाहिले असता, दाेघांपैकी एकाची चप्पल पाण्यात तरंगताना दिसली. त्यामुळे त्यांना संशय अाला. त्यांनी शेतमजुरांना अावाज दिला असता ते धावून अाले. त्यांनी दाेघा चिमुरड्यांना बाहेर काढले. तहसीलदार वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी येवले यांनी पंचनामा केला. तीन दिवसांपूर्वी खदाणीत चार फूटही पाणी नव्हते. मात्र, गेले दाेन दिवस झालेल्या पावसाने खदाणीत १० ते १२ फुटांपर्यंत पाणी साचले. हीच बाब शिवराम अारती या दाेघा भावाबहिणींना जीवघेणी ठरली.

तीन बहिणींच्या पाठचा भाऊ
मयत शिवराम अारती यांच्या पश्चात अाई, वडील, दाेन बहिणी असा परिवार अाहे. शिवराम हा तीन बहिणींचा एकुलता भाऊ हाेता. त्याच्यासह अारतीच्या जाण्याने कुटुंबावर अाघात काेसळलाय.
बातम्या आणखी आहेत...