आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्हा बँकेच्या सहा शाखांची झाडाझडती, नाेटाबंदीच्या काळात बदलून दिले 73 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेपडा - नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ ते ११ नाेव्हेंबरदरम्यान जळगाव जिल्हा बँकेच्या चाेपडा शाखेतून सुटीच्या दिवशीही  ७३ लाखांची राेकड बदलून देण्यात अाल्याचे उघडकीस अाले अाहे. याप्रकरणी मुंबई पाेलिसांच्या गुन्हे शाखेने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, चाेपडा शाखेचे व्यवस्थापक डी.बी. पाटील, कॅशियर रविशंकर गुजराथी यांच्यावर गुन्हा दाखल अाहे. त्यानुसार केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाने गुरुवारी चाेपडा शाखेत तळ ठाेकून तब्बल ११ तास सर्व कागदपत्रांची तपासणी केली.  जिल्ह्यातील एकुण सहा शाखांची चाैकशी करण्यात अाल्याची माहिती पथकाने दिली अाहे.
 
‘सीबीअाय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बँकेच्या चाेपडा शाखेला गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भेट दिली. त्या वेळी शाखा व्यवस्थापक डी. बी. पाटील, कॅशियर रविशंकर गुजराथी यांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, चाैकशी पथकाने पाटील व गुजराथी यांच्या निवासस्थानीही जाऊन अावश्यक ती माहिती जाणून घेतली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे पथक चाेपड्यात तळ ठाेकून हाेते. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आर. एस. गोसाई, महिला पोलिस निरीक्षक सीमा गुप्ता, मुकेश प्रचंड, तीन कॉन्स्टेबल तसेच नऊ पंच हाेते. 
 
‘भारत सरकार’ असे नाव असलेली स्काॅर्पिअाे,  इंडिका  व अन्य  गाडीसह हे पथक दाखल झाले हाेते. चाेपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेने ज्या दिवशी ७३ लाख रुपये नाेटबंदीच्या काळात बदलून दिले त्या संदर्भातील सर्व दस्तएेवज चाैकशी पथकाने 
सील करून चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहेत.   
 
बातम्या आणखी आहेत...