आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटांतही ‘सिक्स पॅक अॅब्स’चा ट्रेंड - अभिनेता भूषण पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मराठी चित्रपटांमध्येही पिळदार शरीराच्या ‘हीराे’ची गरज भासू लागली अाहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत येताना शरीर कमावूनच यायला हवे. त्यासाठी ‘सिक्स पॅक अॅब्स’ची तयारी ठेवायला हवी, असे मत ‘अाेळख’ चित्रपटात झळकलेल्या धुळ्यातील भूषण पाटील याने सांगितले. तसेच चित्रपट क्षेत्रात करिअर करताना खूप अडचणींचा सामना करावा लागताे, असे या चित्रपटातील अभिनेत्री खुशबू हिने सांगितले. ‘दिव्य मराठी’शी मनमाेकळा संवाद साधताना दाेघे बाेलत हाेते.

मुळात भूषण हा पढावदसारख्या लहान गावातून अाला अाहे. गुणांच्या बळावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांच्यासोबत काम केले अाहे. धुळे शहरात तंत्रनिकेतनचे शिक्षण घेतल्यानंतर भूषणने अभिनयाच्या अासक्तीतून मुंबई गाठली. तिथे उत्तंुग इच्छाशक्तीच्या बळावर ‘ओळख’ चित्रपटातून दमदार एंट्री केली आहे. खुशबूने यापूर्वी एक मराठी चित्रपट काही मालिका केल्या अाहेत. या दाेघांनी सांगितले की, मराठी चित्रपटांचा त्याकडे पाहण्याचा ट्रेंड बदलत अाहे. लहानशा िवषयावरून गगनभरारी घेणाऱ्या दिग्दर्शकांची संख्या वाढली अाहे. संवेदनशील विषय मनाला भुरळ घालत अाहेत. अाता मराठीतील हीराेही फायटर दिसायला पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटतेय. त्यासाठी पिळदार शरीर तयार करावे लागते. या चित्रपटासाठी नाशिकच्या पाेलिस प्रशिक्षण अकादमीत काही दिवस प्रशिक्षण घेतले. तसेच दरराेज जिमच्या वाऱ्या केल्या. तेव्हा पिळदार शरीर सिक्स पॅक अॅब्स तयार झाले. पदार्पणाच्या कालावधीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ‘ओळख’ या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसोबत काम करण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र, ही संधी मोठ्या संघर्षातून मिळाली असल्याचे भूषणने सांगितले. या वेळी त्याने सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या संधी आहेत. मात्र, त्याकरिता कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे. यशासाठी त्यात सातत्य आवश्यक असल्याचे त्याने सांगितले.

खुशबू म्हणाली, तारेवरची कसरत
‘तारकमेहता का उल्टा चष्मा’फेम बुलबुल म्हणजेच खुशबू तावडे या अभिनेत्रीने या वेळी विद्यार्थ्यांशी वार्तालाप करताना सांगितले की, ‘ओळख’ चित्रपटात काम करण्यापूर्वी अनेक हिंदी मराठी मालिकांमधून कामाची संधी मिळाली आहे. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील सहभागापासून इथपर्यंतचा प्रवास खडतर होता. मात्र, या प्रवासात कोठेही डगमगले नाही. कारण अंतिम ध्येय निश्चित होते. त्यामुळे ‘ओळख’सारख्या दमदार चित्रपटात संधी मिळाली. हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मराठी तरुणींना आहे. इतर राज्यांतील तरुण-तरुणी मायानगरीत नशीब अाजमावण्यासाठी येतात. त्या तुलनेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या कमी आहे. मात्र, जी एनर्जी जिद्द ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आहे, ती इतरांमध्ये नसल्याचेदेखील खुशबूने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...