आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा रस्ते हस्तांतरणाविरोधात शहरातील नागरिक एकवटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेकडे शहरातून जाणाऱ्या सहा राज्य मार्गांच्या हस्तांतरणाचा निर्णय म्हणजे दारू दुकानांना अप्रत्यक्ष संरक्षण देणे आहे. त्यामुळे याविरोधात जळगाव फर्स्टतर्फे जनअांदाेलन उभारण्याची तयारी सुरू झाली अाहे. महापालिकेनेही याला थेट विराेध करावा, तसेच शासनाने निर्णय रद्द करावा, यासाठी अाता जनतेचा दबाव निर्माण करण्यात येणार अाहे. यानिमित्ताने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी शहरात १७ ठिकाणी स्वाक्षरी माेहीम राबवण्यात येणार अाहे. 
 
राज्य सरकारने जळगाव शहरातून जाणारे राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे शहरातील ४५ दारू दुकानांना संरक्षण मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी जळगाव फर्स्ट सामाजिक संघटनांची गुरुवारी सकाळी डाॅ. राधेश्याम चाैधरींच्या हाॅस्पिटलमध्ये बैठक झाली. या वेळी सहा रस्त्यांच्या हस्तांतरणाला विराेध करून जन अांदाेलन उभारण्याचा निर्णय घेण्यात अाला. या माध्यमातून शुक्रवारी शहरातील प्रमुख चौकांत नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. यात इच्छुक संघटनांनी आपल्या सोयीच्या चौकात स्टॉल लावून नागरिकांच्या सह्या घ्याव्यात, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे. 

स्वाक्षरी माेहिमेचा प्रभाव शक्य 
सर्वोच्चन्यायालयाने जी दुकाने बंद करायला सांगितली ती वाचवण्यासाठी महापालिकेचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असतील, तर एकेक नागरिकाने आपली सही करून दारू दुकानांचे संरक्षण रोखायला हवे, असे आवाहन जळगाव फर्स्टचे प्रणेते डॉ. चौधरी यांनी केले. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करणारा ठराव एकमताने पारित करावा, असे खुले आवाहन केले. 

...याठिकाणी स्वाक्षरी माेहीम 
जळगाव फर्स्टतर्फे शिव काॅलनी बस स्टाॅप, जळगाव जागृत मंचतर्फे मनपासमाेर, जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे साेनाळकर काॅम्प्लेक्स, अादर्श फाउंडेशनतर्फे अयाेध्यानगर, सद‌्गुरूनगर, अशाेकनगर, महाबळ काॅलनी , भारती पाथरकर यांच्यातर्फे गुजराल पेट्राेलपंप, अाकांक्षा व्यसनमुक्ती केंद्रातर्फे गणेश काॅलनी चाैक, प्रवीण पाटील फाउंडेशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुल, जनसंघर्ष मंचतर्फे पंचमुखी हनुमान मंदिर, मुक्ताई महिला मंडळातर्फे नवीपेठ, चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जिल्हा बँक, रिंगराेड, लाेकशाहीवादी नागरिक मंचतर्फे एम. जे. काॅलेज, ब्लॅकअाऊट ग्रुपतर्फे महाबळ, माय-माऊली फाउंडेशनतर्फे अादर्शनगर, मेहरूण संघर्ष समितीतर्फे मेहरूण, मुस्लिम समन्वय समितीतर्फे तांबापुरा, अमन फाउंडेशनतर्फे मास्टर काॅलनी, माैलाना अाझाद अल्पसंख्याक संस्थेचे सलिम इनामदार स्टॉल लावणार आहेत. 
 
खाविआ रस्त्यांचे पालकत्व नाकारणार ? 
महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीची गुरुवारी पार्टी मीटिंग झाली. या बैठकीत महासभेतील अजेंड्यावरील विषयांसह शासनाने हस्तांतरित केलेल्या सहा रस्त्यांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. या वेळी प्रथमच महिला नगरसेविकांनाही बोलवण्यात आले होते. नगरसेवकांनी रस्त्यांच्या पालकत्वासंदर्भात आपापली मते मांडली. दरम्यान, शासनाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत जनमनाचा आदर करण्याचा सूर निघाला. त्यामुळे महासभेत खाविआ सहा रस्त्यांचे पालकत्व नाकारण्याची शक्यता आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...