आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे सहा पर्यटक काश्मिरात अडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अतिरेकी बुऱ्हान वनी याला भारतीय सैन्याने ठार केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला आहे. याचा फटका खान्देशातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांना बसला आहे. यात जळगाव शहरातील सहा पर्यटक बालटार या भागात दोन दिवसांपासून थांबवले आहेत. सुरक्षेसाठी तेथे सैन्य दलाच्या तुकड्या घटनास्थळी पोहाेचल्या आहेत, अशी माहिती चंदू पाटील यांनी बालटार येथून ‘दिव्य मराठी’शी फोनवर बोलताना दिली.

शहरातील भाजी मार्केट येथील व्यापारी चंदू पाटील, सुभाष भोई, श्याम कोठावदे, अजय पाटील, भरत पाटील आणि रवींद्र ठाकूर हे सहा पर्यटक जुलै रोजी मुंबईहून विमानाने श्रीनगर येथे पोहाेचले. त्यानंतर त्यांनी जुलै रोजी अमरनाथचे दर्शन घेतले. परतीच्या मार्गावर असताना काश्मीर खोऱ्यात उफाळलेल्या हिंसाचारामुळे तणाव निर्माण झाला आहे. सुरक्षेसाठी तेथील सैन्य दलाने भाविक पर्यटकांना थांबवून ठेवले आहे.
यात जळगावसह चोपडा, भुसावळ, धुळे, शिरपूर, चाळीसगाव येथील काही प्रवासी बालटार येथे आहेत. जुलैपासून सर्वजण बालटार येथे अडकले आहेत. सध्या ते जम्मूपासून सुमारे ३७५ किलोमीटर लांब अंतरावर आहेत. येत्या दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती सैन्याचे वरिष्ठ अधिकारी पर्यटकांना देत आहेत.

सोबत सैन्यदल
बालटार,सोनमर्ज भागात अद्याप पाऊस नाही. त्यामुळे अडकून असलेले पर्यटक मोकळ्या जागेत, मंडपात मुक्काम करीत आहेत. जर पाऊस पडण्यास सुरुवात झाली तर मुक्कामात अनेक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच येथे लंगर सुरू असल्यामुळे जेवणाचाही प्रश्न सुटला आहे. सैन्य दलाच्या तुकड्या सोबत असल्यामुळे सुरक्षित वातावरणही निर्माण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...