आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहावा वेतन आयोग फरकासाठी पालिका कर्मचार्‍यांचे आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम त्वरित द्यावी, महागाई भत्त्याचा फरक अदा करावा, पगार, पेन्शन 10 तारखेच्या आत करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच महापालिकेसमोर दुपारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर, विजय पवार यांनी केले. पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात संघटनेने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे 100 टक्के वेतन शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे द्यावे, तसेच इतर अनुदाने निवृत्तीच्या दिवशी देण्याची मागणी केली आहे. मानधनावर नियुक्त असलेले सर्व रोजंदारी, अस्थायी, वैद्यकीय क्षेत्रातील लिंक वर्कर्सना विना अट सेवेत कायम करावे. सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्यांचा मोबदला द्यावा, सफाईचे साहित्य द्यावे. तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात यावी. विभागीय पदोन्नती समिती बोलविण्यात यावी. सेवाज्येष्ठता, पदस्थापना, पदोन्नती आणि वरिष्ठ वेतनश्रेणीची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. आंदोलनात यास्मिन पटेल, प्रतिभा पाटील, अरुणा चौधरी, रत्ना मोरे, मुरलीधर खडके, अजय घेंगट, बळीराम पाटील, छाया बिरारी, कल्पना कोळी, योगीता सोळुंके, दीपाली तायडे, कविता वाणी यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.