आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sixth Pay Commission, Latest News In Divya Marathi

फरकासाठी मनपाला महिन्याचा अल्टिमेटम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सहाव्या वेतन आयोगाचे वेतन अन् महागाई भत्त्याच्या फरकाची दोन वर्षांची रक्कम महिनाभरात मिळावी, अशी मागणी शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. प्रशासनाने याप्रकरणी ठोस निर्णय न घेतल्यास, स्थगित केलेले काम बंद करून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेतर्फे गुरूवारी देण्यात आला आहे.
आपल्या मागण्यांसंदर्भात गुरुवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. दरम्यान, आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्मचार्‍यांची बैठक बोलावून केलेले मार्गदर्शन आणि संघटनेला लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सभा घेऊन वरीलप्रमाणे इशारा दिला आहे. या द्वारसभेत शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर, बळीराम पाटील, मुरली खडके, विजय पवार, राजू ठाकूर, कैलास गायकवाड यांच्यासह पदाधिकारी होते. द्वारसभेनंतर संघटनेतर्फे उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.