आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांना सरसकट आर्थिक मदत द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे प्रशासकीय यंत्रणेने कार्यालयात बसून केले आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. पुन्हा पंचनामे करणे शक्य नसल्यामुळे गारपीट झालेल्या गावातील शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदतीची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत त्यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन दिले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटील, उपनेते गुलाबराव पाटील, विश्वनाथ पाटील, महानंदा पाटील, मच्छिंद्र पाटील, गजानन मालपुरे, श्याम कोगटा, चेतन शिरसाळे, कांताबाई मराठे, शोभा चौधरी, मंगला बारी उपस्थित होते.
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासकीय यंत्रणेने पैसे घेऊन केले आहेत. त्यामुळे नुकसान होऊनदेखील केवळ पैसे न दिल्यामुळे खर्‍या गरजू शेतकर्‍यांना शासनाची मदत मिळालेली नाही. याउलट कोणतेही नुकसान न झालेल्या शेतकर्‍यांना फळबागांसाठी मोठी आर्थिक मदत मिळाली आहे. यावर प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनात केली आहे.