आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीमुक्त शहर संकल्पनेला हरताळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-‘साक्षर शहर, सुंदर शहर, हिरवेगार शहर’ असे जळगाव पालिकेचे ब्रीद वाक्य आहे. सुंदर शहर करण्यासाठी शहरातील झोपडपट्टी व गलिच्छ वस्त्या निर्मूलनाचे काम वेळोवेळी केले आहे, अजूनही केले जात आहे. एकीकडे झोपडपट्टी निर्मूलन सुरूअसताना पालिकेच्या पिंप्राळ्यातील जागेवर झपाट्याने नवीन झोपडपट्टी वसत आहे. या संदर्भात वर्षभरापूर्वीच अहवाल प्राप्त होऊनही प्रशासनाकडून कारवाई न करता झोपडपट्टीमुक्त शहर संकल्पनेला हरताळ फासण्याचे काम सुरूआहे.
नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर पिंप्राळा ग्रामपंचायतीचा समावेश महापालिका हद्दीत झाला. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या जागाही पालिकेच्या मालकीच्या झाल्या आहेत. पिंप्राळा गावालगत असलेल्या सुमारे दोन एकर जागेपैकी काही जागेवर नुकतीच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. या स्मशानभूमीच्या मागील बाजूस पालिकेची सुमारे सव्वा एकर जागा असून त्यावर अतिक्रमण केले जात असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनापर्यंत आल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन अधिकार्‍यांनी यासंदर्भात अहवाल तयार केला होता.
हा अहवाल नगररचना विभागाकडे पुढील कारवाईसाठी सादरही करण्यात आला होता. मात्र त्याचे गांभीर्य लक्षात न आल्याने प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. झोपडपट्टी होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना न केल्याने पालिकेला ख्वाजामियाँ प्रकरण भोवले होते. पिंप्राळ्यातील पालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीला वेळीच आळा न घातल्यास आर्थिक फसवणूक सुरूच राहील.