आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे करार वादात रुतली स्मार्ट सिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुमारे६०० कोटींचे कर्ज,गाळे कराराचा तिढा आणि विविध कोर्ट कज्जांमध्ये अडकलेल्या जळगाव शहराचे स्मार्ट सिटीचे ‘दिवास्वप्न’च ठरणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर पालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोतच आटणार असल्याने आता जुने फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केट या दोन मार्केटमधील गाळ्यांच्या लिलावावरच पालिकेची भिस्त आहे. या दोन मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव झाल्यास सुमारे दीडशे ते दोनशे कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते. राजकीय साठमारी, अाडमुठेपणापायी शहराचा विकास खुंटला असून पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, व्यापारी, मनपा प्रशासनाने समन्वयाने त्वरित तोडगा काढून विकासाचा मार्ग मोकळा केला पाहिजे.
स्मार्ट सिटीच्या स्वयंमूल्यांकनात जळगाव शहर ३५ गुणांसह काठावर पास झाले आहे.त्यामुळे स्मार्ट सिटीच्या शर्यतीत राहण्यासाठी गाळे कराराचा वाद शक्य तितक्या लवकर सोडवणे अत्यंत अावश्यक आहे. हुडको, जिल्हा बँकेच्या कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या महापालिकेसमोर आता ऑगस्टपासून दररोजच्या खर्चाची हातमिळवणी करणेही अवघड जाणार आहे.

१८
मार्केट
२१७५

गाळे
जुने बी.जे.मार्केट २७२
मुखर्जी मार्केट ०७
जुने शाहू मार्केट ११२
धर्मशाळा मार्केट ०६
रेल्वे स्टेशन चौक १८
नानीबाई अग्रवाल ३०
भास्कर मार्केट २८१
महात्मा गांधी मार्केट १३७
टॉवरखालील दुकान ०४
छत्रपती शाहू मार्केट १७५
वालेचा मार्केट १२
डॉ. आंबेडकर मार्केट ६४
भोईटे मार्केट २४
रामलाल चौबे ४०
सेंट्रल फुले मार्केट ६५१
महात्मा फुले मार्केट २५९

मनपाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून वर्षांपूर्वी केलेले मालमत्तांचे मूल्यांकन
सेंट्रल फुले मार्केट ६४.८६ कोटी
महात्मा फुले मार्केट ८५.५९ कोटी
जुने भिकमचंद जैन मार्केट ३८.०५ कोटी
भोईटे मार्केट ५०.४५ लाख
मीनाताई ठाकरे मार्केट ५.५७ कोटी

रेडी रेकनरनुसार मनपाला मिळणारे उत्पन्न असे
हुडकाे : पालिकेनेहुडकोकडून १९८९ ते २००१ या कालावधीत १४१ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाचा परतफेडीचा कालावधी सन १९९० ते २००३ असा होता. अातापर्यंत महापालिकेने हुडकाेला सुमारे २३० काेटी रुपये भरणा केला अाहे. अजूनही हुडकाेचे पालिकेकडे ५१३ काेटी ९१ लाख रुपये घेणे असल्याचे दिसते.

जिल्हा बंॅक : पालिकेनेजिल्हा सहकारी बॅँकेकडून सन १९९७ ते २००१ या कालावधीत ५९ कोटी ३४ लाख रुपये कर्ज घेतले होते. रिसेटिंग नंतर जानेवारी २००९ पर्यंत ६९ कोटी ९८ लाख ५० हजार ७०४ रुपये कर्ज त्यावरील व्याज ६१ कोटी ६१ लाख ६६ हजार ६४२ असे एकूण १३१ कोटी ६० लाख १७ हजार ३४६ रुपये दाखवली गेली. आतापर्यंत महापालिकेने १२७ कोटी रुपये कर्ज फेडले आहे. पालिका दर महिन्याला एक कोटी जमा करीत आहे. आजच्या स्थितीत िजल्हा बँकेचे पालिकेकडे ५४ कोटी ६० लाख घेणे अाहे.

लिलाव झाल्यास महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल िवकास साधता येईल.
लिलाव झाल्यास शहरातील अन्य व्यापाऱ्यांनाही दुकानाची संधी मिळेल.
लिलाव झाल्यास बाहेरील माेठ्या व्यावसायिकांनाही गुंतवणूक करता येईल.

काय अाहे सद्य:स्थिती
२०१४च्या रेडी रेकनरनुसार दुकानाच्या नेट मूल्यावर टक्के भाडे विचारात घेऊन येणारी प्रीमियम रक्कम ही १० टक्के दराने प्रति वर्ष अशी वाढ विचारात घेऊन ३० वर्षांकरिता प्रचलित मूल्य लक्षात घेऊन येणाऱ्या प्रीमियमची एकरकमी अाकारणीचा ठराव क्रमांक १३५ महासभेने मंजूर केला अाहे. या ठरावाच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली अाहे. सन २०१२ च्या रेडी रेकनरनुसार घसारा वगळून मूळ मापानुसार रक्कम देण्याची गाळेधारकांची तयारी अाहे. गाळे सील प्रकरणात अाता वाद न्यायालयात पाेहचला असून गाळेधारकांनी अाव्हान दिलेल्या ठराव क्रमांक १३५ संदर्भात अद्याप मार्ग निघू शकलेला नाही. त्यामुळे सद्या न्यायालय राज्य शासनाच्या दरबारी काय निर्णय हाेताे, यावर पालिकेचे जळगावकरांचे भवितव्य अवलंबून राहणार अाहे.

लिलावचदेईल संजीवनी
महापालिकेने२०१४ च्या रेडी रेकनरनुसार ते १२ टक्केपर्यंत सर्वच पातळीवर अाकडेवारी काढली अाहे. टक्क्यानुसार मंजूर नकाशानुसार मनपाला १६० काेटी रुपये उत्पन्न अपेक्षित अाहे. परंतु हे किमान उत्पन्न गृहीत धरून गाळ्यांचा लिलाव केल्यास २५ टक्के वाढीव रकमेनुसार पालिकेला तब्बल २०० काेटींचे उत्पन्न मिळू शकेल. वाढीव बांधकामानुसार २०१४ च्या रेडी रेकनरने पालिकेला २३९ काेटी ८७ लाख रुपये मिळतील. हे किमान उत्पन्न मानल्यास लिलाव करून त्यात किमान २५ टक्के वाढ झाल्यास तब्बल ३०० काेटींपेक्षा अधिक रक्कम मनपाच्या तिजाेरीत जमा हाेऊ शकते. हाच अाकडा २०१२ च्या रेडी रेकनरनुसार १५३ काेटी ९२ लाख १५ हजार ९२३ येताे. ही किमान उत्पन्नाची रेषा मानली तर लिलावातून २५ टक्के अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यास पालिकेच्या तिजाेरीत १९२ काेटी ४० लाख १९ हजार ९०४ जमा हाेऊ शकतील.

सेंट्रल फुले मार्केट : ९९काेटी ७९ लाख ६० हजार ५४ रुपये.
जुनेफुले मार्केट : ६७काेटी ४२ लाख ६६ हजार ३१७ रुपये.
सेंट्रल फुले मार्केट : ११६काेटी ९९ लाख ७६ हजार ६३८ रुपये.
जुनेफुले मार्केट : १२२काेटी ८७ लाख ५७ हजार ७५४ रुपये.
सेंट्रल फुले मार्केट : ९४काेटी २२ लाख २७ हजार ६६६ रुपये.
जुनेफुले मार्केट : ६५काेटी ९३ लाख ७२ हजार ७०३ रुपये.
सेंट्रल फुले मार्केट : ७८काेटी ३८ लाख ९२ हजार ६५७ रुपये.
जुनेफुले मार्केट : ७५काेटी ५३ लाख २३ हजार २६६ रुपये.
कै.निर्मलाबाई लाठी शाळा इमारत : हॉल
शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने : ०२