आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart City Dream Is Not Complit For Economics Problem

आर्थिक पेचामुळे ‘स्मार्ट सिटी’ साकारण्याचे स्वप्न धूसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरालास्मार्ट सिटी बनवण्यासाठी महापाैर तयार आहेत. मात्र, मनपासमाेर असलेल्या आर्थिक आव्हानांचा पेच पाहता स्मार्ट सिटीचे चित्र धूसरच होत जाईल, असे दिसते. मुळात महापालिकेकडे वेतनासाठीच जवळपास पाच कोटींचा निधी जमतो . इतर कुठलीच देणी दिली जात नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी १० ते ५० कोटींचा निधी उभारणार तरी कसा, असा प्रश्नही पुढे येत आहे.

धुळे महापालिकेनेही स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी केली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी दिल्लीत कार्यशाळा घेण्यात आली. त्या कार्यशाळेला महापौर जयश्री अहिरराव यांची उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीविषयी नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. यामध्ये शहरात राहणा-या ववििध स्तरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे अंतर्भूत आहे. त्याप्रमाणे नागरी सुविधा देताना त्यात नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा ठरणार आहे. जे काही स्मार्ट उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यात नागरिकांचा किती सहभाग आहे. नागरी सुविधा घेताना त्यासाठी नागरिक या शहराला िकती योगदान देणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेलाही या सर्व गोष्टी उभारताना स्वनिधी उभारावा लागणार आहे. वर्षाला ५० कोटी रुपयांचा निधी उभा करायचा आहे. त्याचप्रमाणे पाण्यापासून ते शहरातील कचरा व्यवस्थापनापर्यंत सर्व सुविधा द्यावयाच्या आहेत.
महापालिका यासाठी प्रयत्न करणार आहे; परंतु त्यासाठी वस्तुस्थितीही लक्षात घ्यायला हवी. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या खालावलेली आहे. कर्मचा-यांचे वेतनही नियमित होत नाही. महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. मनपा प्रशासनाला नियमित खर्च करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कर्मचा-यांचे वेतन, आवश्यक बिले असे दर महिन्याला साधारणपणे सहा ते साडेसहा कोटी रुपये खर्च येतो. वेतनावरच साडेपाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. महापालिकेने वसुलीची मोहीम सुरू करून जप्ती, दंड, सिलिंग कारवाई वाढवल्याने वसुली वाढली आहे. एलबीटीतही वसुली वाढली आहे. मात्र असे असतानाही उत्पन्न चार कोटीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आर्थिक आव्हान मोठे आहे. त्यानंतर पाणीपुरवठा नियमित करावयाचा आहे. शहरात सर्वत्र विजेची सुविधा, पाण्याचे मिटरिंग करणे, कच-या चे व्यवस्थापन करणे, गरिबांसाठी घरांचे निर्माण, त्याचप्रमाणे शहरातील सर्व भागातील नागरिकांना त्यांच्या भागात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. त्यात रस्ते, शहर बस सुविधा, नागरिकांना खरेदीसाठी सुसज्ज मार्केट त्या-त्या भागात विकसित करावयाचे आहे. त्यामुळे पायाभूत आराखडा तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

निधीसाठी प्रयत्न करणार
^केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिका सहभाग घेणार आहे. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. यात नागरिकांचा, प्रशासनाचा मोठा सहभाग घेण्यात येईल. सर्व मिळून प्रयत्न केल्यास धुळे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश शक्य आहे. जयश्री अहिरराव, महापौर, मनपा,धुळे

हद्दवाढीचाही पडेल प्रभाव
महापालिकेच्या हद्दवाढीची प्रक्रिया शासकीय पातळीवर सुरू आहे. यात शहराजवळील १६ गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे नियोजन करताना महापालिका प्रशासनाला हेही लक्षात घ्यावे लागणार आहे. त्यातून महापालिकेचे क्षेत्र वाढल्याने त्याचा व्याप वाढणार आहे.
आिर्थक संकट