आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट ग्राम योजनेतून विकासाला मिळेल चालना, जिल्हास्तरावर मिळेल ४० लाखांचे पारितोषिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शासनाने‘स्मार्ट ग्राम’ योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. योजनेंतर्गत स्मार्ट गावाला तालुकास्तरावर १० लाख तर जिल्हास्तरावरील स्मार्ट गावाला ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेमुळे गावातील विकासकामांना अधिक चालना मिळणार आहे.
आर्थिक सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेच्या निकषात शासनाने बदल केले आहेत. नवीन निकषानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची संधी आहे. निवड झालेल्या ग्रामपंचायतींची विविध प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती, शहरालगतच्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी किंवा पेसा ग्रामपंचायतींसह उर्वरित ग्रामपंचायतींना योजनेत सहभाग घेता येईल. ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन दिले जाईल. स्वच्छता, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता तंत्रज्ञानाचा वापर या अाधारावर ग्रामपंचायतींना १००पैकी गुण दिले जाणार आहेत. योजनेतील निवडीकरिता ग्रामपंचायतीने स्वमूल्यांकन करून आपापले प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात ते १५ डिसेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

तीनमहिन्यांनी मूल्यांकन : तीनमहिन्यांनंतर ग्रामपंचायतींचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केले जाईल. या योजनेमुळे गावांमधील विकासाची गती वाढेल. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.

समिती होणार स्थापन
मूल्यांकनातअधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकास्तरावर तपासणी करण्यासाठी समिती स्थापन होणार आहे. तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तालुकानिहाय तपासणी करणार आहे.

^शासनाच्या स्मार्टग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे पत्र दिले जाईल. सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींनी स्वमूल्यांकनाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
यू.पी.पाटणकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, पंचायत समिती,भुसावळ
बातम्या आणखी आहेत...