आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवमतदारांना मिळणार स्मार्ट ओळखपत्र; नावनाेंदणीला सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता सोशल मीडियाचा वापर करण्याचे ठरवले आहे. जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या तरुण-तरुणींची नोंदणी करून त्यांना ‘सहस्त्रक मतदार’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. त्यांचा २५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदार दिनाच्या कार्यक्रमात विशेष गौरवही करण्यात येणार आहे. याशिवाय नवमतदारांना स्मार्ट मतदान ओळखपत्र वितरीत केले जाणार आहे. या दृष्टीने गावात बीएलओ मार्फत नवमतदारांचा शोध घेऊन नोंदणी सुरू झाली आहे. 


भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार छायाचित्र याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रम ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे. हा कार्यक्रम ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमात जानेवारी २००० या दिवशी जन्मलेल्या युवक-युवतींचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समावेश करण्यात येणार आहेत. या मतदारांना सहस्त्रक मतदार (मिलेनियम व्होटर) असे संबोधण्यात येत आहे. यांनी आपली नोंदणी nvsp.nic.in व्दारे करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नोंदणी झालेल्या युवक-युवतींचा २५ जानेवारी २०१८ रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ‘मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे’, (I am the Millennium Voter Of India) असे लिहिलेला खास बॅच देऊन सत्कार करण्यात येणार आहे. 


निवडणूक कार्यालयाचे आवाहन 
सहस्त्रकमतदारांनी नोंदणी झाल्यानंतर त्यांचे छायाचित्र मतदार ओळखपत्र स्वत:च्या फेसबुक पेजवर टाकावे. तसेच सदरचे छायाचित्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, भारत निवडणूक आयोगाच्या फेसबुक पेजशी टॅग करावे. जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या तरुण-तरुणींनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. 


मतदार नोंदणीसाठी साहित्य नेणाऱ्या बीएलओंवर कारवाई 
मतदार नोंदणी संदर्भात शुक्रवारी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे अडचणी मांडल्या. ऑनलाइन नोंदणीसाठी दिलेल्या अॅप वर काम करताना येत असल्याबाबत तक्रारी जास्त होत्या. मतदार नोंदणीचे काम ऑनलाइन ऑफलाइनही करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. मात्र, नोंदणीसाठी निवडणूक विभागाकडून साहित्यच घेऊन जाणाऱ्या बीएलओंवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीला तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार रूपाली काळे यांनी मार्गदर्शन केले. 

बातम्या आणखी आहेत...