आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SMS On Canvasing Banned In Jalgaon Municipal Corporation Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव महापालिका निवडणूकl; ‘एसएमएस’वरील प्रचारालाही बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या मोबाइलवरील एसएमएसला देखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रचारासाठी लावलेले बॅनर व होर्डिंग्ज प्रचाराची मुदत संपण्यापूर्वीच काढून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.

शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेनंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही. यात इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहणार असून त्यात एसएमएसचाही समावेश आहे. मालमत्ता विद्रुपीकरणांतर्गत लेखी परवानगी न घेता खासगी मालमत्तेवर राजकीय पक्ष व उमेदवारांनी भित्तीपत्रके, घोषणा, निवडणूक चिन्हे इत्यादी चिकटवून किंवा लिहून ती मालमत्ता विद्रूप केली असल्यास ते काढून टाकण्याची जबाबदारी उमेदवारावर राहणार आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदार नसलेल्यांना त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये वास्तव्य न करण्याचे आदेश आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांना पोलिस, हद्दीबाहेर हलवण्याची कार्यवाही करू शकतील. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहतुकीची आणि वाहनांची व्यवस्था करणे यासारख्या ‘भ्रष्टाचाराच्या’ आणि निवडणूक कायद्यांतर्गंत गुन्हा समजल्या जाणार्‍या गोष्टी सर्व उमेदवारांना पाळाव्या लागतील.

मतदानाच्या दिवशी बाजार बंद
1 सप्टेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.