आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टा बंद करण्यासाठी नगरसेविकेची गांधीगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पोलिसांना निवेदन देऊनही सट्टापेढी, जुगार अड्डे बंद पडत नसल्यामुळे मेहरूण येथील नगरसेविका सुमित्रा सोनवणे यांनी गांधीगिरीचा अवलंब केला. सोनवणे यांनी काही महिलांसह शनिवारी सट्टापेढी चालवणार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला; तसेच सट्टापेढी बंद करण्याची विनंती केली.

मेहरूण भागात तीन-चार ठिकाणी सट्टापेढय़ा सुरू आहेत; तसेच जुगाराचे अड्डेही चालवले जात आहेत. परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. नगरसेविका सोनवणे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी 21 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे निवेदन देऊन सट्टापेढी बंद करण्याची मागणी केली होती. निवेदन मिळाल्यानंतर पोलिसांनीही सट्टापेढी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या. तीन-चार दिवस सट्टापेढय़ा बंद राहिल्या. मात्र, पुन्हा त्या सुरू झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी वारंवार होत असतानाही नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यासाठी शनिवारी सोनवणे यांच्यासह काही महिलांनी सट्टापेढी चालकांना बुके देऊन त्यांचा सत्कार केला आणि सट्टापेढी बंद करण्याची विनंती केली.