आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक: गोगलगायीचे अस्तित्व नामशेष होण्याची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पर्यावरणाच्या असमतोलामुळे अजिंठा परिसरातून भटकंती करीत लाखो गोगलगायींनी वाघूर धरण परिसरात प्राण सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धरणाच्या परिसरात शंखांचा ढीग साचलेला दिसत आहे. या प्रकारामुळे गोगलगायींचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत जीवशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केले.

अजिंठा ते जळगाव हा 55 किलोमीटरचा परिसर वाघूर नदीमुळे पाणथळ असतो. वर्षभरातील आठ महिने नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर जीव-जंतू, प्राण्यांचा रहिवास असतो. पाण्याच्या प्रदूषणामुळे तसेच खाद्याच्या शोधात या प्राण्यांना विविध ठिकाणी फिरावे लागते. नदीकाठच्या शेतांमध्ये कीटकनाशक, तण नाशकांचा वापर होतो. त्यामुळेही या जीव-जंतूंना अन्न मिळणे कठीण होते. त्याचाच फटका वाघूर धरण परिसरातील गोगलगायींना बसला आहे. त्यांनी तेथे काही दिवस रहिवास केला अन् शेवटी याच ठिकाणी प्राण सोडले.

खाद्य उपलब्ध तेथे रहिवास
गोगलगायी झाडांची पाने, वनस्पती खातात. त्यामुळे गोगलगायी स्थलांतर करतात. जर वाघूर धरणाजवळ जास्त गोगलगायी आल्या असतील तर त्यांनी वाघुरच्या पाणलोट क्षेत्रातून प्रवास केला असेल. धरण परिसरात अन्न उपलब्ध होते म्हणूनच तेथे गोगलगायींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असेल.
-डॉ.आर.टी.महाजन, विभागप्रमुख, जीवशास्त्र विभाग, मू.जे.महाविद्यालय