आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर परिसरात आढळले ‘स्नेक बर्ड’ अन् ‘स्नेक ईगल’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - संकटग्रस्त (रेडडाटा लिस्ट) यादीत समावेश असलेल्या दुर्मीळ शिकारी पक्षी ‘स्रेक बर्ड’ आणि ‘स्रेक ईगल’ पक्षांचा वाघूर परिसरात रहिवास असल्याच्या नोंदी वन्यजीव संरक्षण संस्थेने केल्या आहेत.
वाघूर परिसरात पक्षांच्या विविध जातींचा अभ्यास, शोध, निरीक्षण आणि गणना करण्याचे काम सुरू असताना शनिवारी या परिसरातून हद्दपार झालेले हे पक्षी आढळून आल्याचा दावा पक्षीमित्रांनी केला आहे. त्या संदर्भातील छायाचित्र व व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांनी पक्षांच्या नोंदी घेतल्या आहेत. वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांनी 1992 साली मेहरूण तलाव परिसरात या पक्षांच्या नोंदी घेतल्या होत्या. त्यानंतर वनविभागाचे निवृत्त आरएफओ विसपुते यांनी चार वर्षांपूर्वी नोंद घेतली होती.
परदेशी पक्ष्यांचे आगमन - थंडीचे वातावरण असल्यामुळे वाघूर धरणाच्या पानवठ्यावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतर करून दरवर्षी येत असतात. पक्षिमित्रांना विविध परदेशी पक्ष्यांसह स्थानिक पक्षांच्या अभ्यासासाठी ही मेजवानी असते. त्यानुसार वन्यजीव संरक्षण संस्थेचे गणेश सोनार, बाळकृष्ण देवरे, रवींद्र पाटील या परिसरात अभ्यास करीत असताना अचानक त्यांना इलेक्ट्रीक टॉवर वर स्नेक ईगल’ (शॉर्ट टोड ईगल) आढळून आला. तर एका झाडावर लांब मान असलेल्या ‘स्नेक बर्ड’ (ओरिएन्टल डार्टर) पक्षांचा जोडा दिसला. तसेच थोड्या अंतरावर ‘स्नेक बर्ड’चे आणखी दोन जोडे आढळून आले. दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून त्यांनी या पक्षांच्या नोंदी घेतल्या आहेत. या पक्ष्यांचे जतन होण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे वनविभागाला निवेदन देण्यात येणार आहे.
माशांवरच डल्ला - या दोन्ही पक्ष्यांचे खाद्य मासे आहे. त्यामुळे फक्त पाणवठ्यांच्या ठिकाणी त्यांचा रहिवास असू शकतो. पाण्याखाली जावून ते मास्यांचा शोध घेऊ शकतात. पानवठ्याजवळील उंच झाडांची कत्तल व मोठ्या प्रमाणात होणा-या मासेमारीमुळे या पक्ष्यांचा जिल्ह्यातील रहिवास कमी झाल्याचा अंदाज पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.