आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याचा वाचवला जीव त्यानेच मारला दंश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ज्याची करावी कीव त्याने घ्यावा जीव या म्हणीचा प्रत्यय मंगळवारी आला. वाहून जाणाऱ्या सापाला वाचवणाऱ्या व्यक्तीस त्याच सापाने दंश मारल्याने प्राण गमवावे लागल्याची दुर्देवी घटना गायत्रीनगरात घडली.

मंगळवारी सायंकाळी शहरात जाेरात पाऊस सुरू झाल्यानंतर गायत्रीनगरातील गटारींमधून एक साप रस्त्यावर वाहत आला. सापाला पाहून भयभीत झालेल्या जमावाने त्याला मारण्यासाठी लाठ्या-काठ्या हाती घेतल्या होत्या. याचवेळी धनंजय मोतीराम बाविस्कर (४०) तेथे पोहोचले. त्यांनी जमावाच्या तावडीतून सापाची सुटका करून त्याला बाजूच्या गवतात सोडून दिला. यादरम्यान सापाने त्यांच्या हातावर दंश केला होता. थोड्या वेळाने त्रास होऊ लागल्यानंतर सापाने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटंुबीयांनी त्यांना तत्काळ सहयोग क्रिटिकल केअर सेंटर येथे दाखल केले. रात्रभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर बुधवारी बाविस्कर प्राण सोडला.
साप आडवा आला रिक्षा उलटली
जळगाव-कानळदा रोडवरील आकांक्षा जिनिंग समोरून जात असताना अचानक साप आडवा आल्याने पॅजो रिक्षा (एमएच १९ जे-१५११ ) उलटली. सापाला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबल्यामुळे रिक्षा उलटली. मीराबाई विश्वास साळुंखे त्यांचा सहा वर्षीय मुलगा जयेश (रा. मंगरूळ, ता. चोपडा) हे जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता हा अपघात घडला.