आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप काही गणेशचा पिच्छा सोडे ना... एकाच व्यक्तीला चार महिन्यांत पाचवेळा सर्पदंश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. शबाना तडवी आणि डॉ. कमलेश पाटील यांनी प्रथमोपचार केले. यानंतर गणेशला जिल्हा सामान्य रुगणालयात पाठवले. - Divya Marathi
डॉ. शबाना तडवी आणि डॉ. कमलेश पाटील यांनी प्रथमोपचार केले. यानंतर गणेशला जिल्हा सामान्य रुगणालयात पाठवले.
यावल (जळगाव) - येथील दहिगाव परिसरात राहणाऱ्या गणेश देवीदास मिस्तरी या व्यक्तीचा साप काही पिच्छा सोडताना दिसत नाही. सापाने या व्यक्तीलाच 4 महिन्यांमध्ये 5 वेळा चावा घेतला आहे. त्यातच बुधवारी सापाने पुन्हा त्याच व्यक्तीचा चावा घेतला आहे. विशेष म्हणजे, घरात 6 व्यक्ती असतानाही साप वेळोवेळी केवळ गणेश यालाच का चावतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कुटुंबीय आणि गावकऱ्यांना पडणाऱ्या या प्रश्नामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे.
 
 
एकाच व्यक्तीला वारंवार साप कसा लक्ष्य करतो यावरून कुटुंबीय चक्क मांत्रिकाच्या फंद्यात पडले आहेत. 35 वर्षीय गणेश चार महिन्यांपूर्वी केळी बागेत शौचासाठी गेला असताना प्रथम साप चावला. यानंतर आणखी तीन वेळा चावा घेणाऱ्या सापाने बुधवारी पुन्हा गणेश पाणी पित असताना अचानक पायावर हल्ला केला. कुटुंबियांना हे कळताच त्यांनी पायाला घट्ट पट्टी बांधून विष पसरण्यापासून थांबवले आणि उपचारासाठी गणेश यांना ग्रामीण रुगणालयात दाखल केले. 
 
 
डॉ. शबाना तडवी आणि डॉ. कमलेश पाटील यांनी प्रथमोपचार केले. यानंतर संबंधितास जिल्हा सामान्य रुगणालयात पाठवले. गेल्या चार महिन्यात पाच वेळा सापाने चावा घेतल्याने गावा सह तालुक्यात मिस्तरीवर सापाचा डाव तर नाही? नागिनचा बदला तर नसावा? विष पचवणारा मिस्तरी अशा विविध चर्चा या इसमाच्या सुरू होऊन अंधश्रध्देला खतपाणी दिले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...