आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसएनडीटी’ जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगा- ‘एसएनडीटी’हे भारतासह जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अाहे. मात्र, या विद्यापीठासंदर्भात खान्देशातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसल्याची खंत प्रा.ए. पी. चौधरी यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त अायाेजित कार्यक्रमात व्यक्त केली.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त अरुणोदय ज्ञानप्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य गृहविज्ञान महिला महाविद्यालयातर्फे रविवारी रॅली काढण्यात आली. तसेच महाविद्यालयात निबंध, रांगोळी या स्पर्धा घेण्यात आल्या.

महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी वाजता निघालेली रॅली प्रोफेसर कॉलनी, उदय कॉलनी, गणेश कॉलनी मार्गाने पुन्हा महाविद्यालयात पोहाेचली तेथे ितचा समारोप झाला. सुरुवातीला विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.ए.पी.चौधरी, तर माजी प्राचार्या डॉ.मंगला जंगले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डाॅ.स.ना.भारंबे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर एसएनडीटी महाविद्यालयाची १०० वर्षांची वाटचाल दर्शवणारा माहितीपट सादर करण्यात आला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नूपुर जैन कीर्ती डब्बे यांनी विद्यापीठ महाविद्यालयाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभावती महाजन यांनी केले, तर डॉ.साधना जावळे यांनी आभार मानले.

संधीचे साेने करा...
डॉ.विनयपाटील यांनी ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवनचरित्र कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ.जंगले यांनी विद्यापीठाचा प्रवास सांगितला. तसेच या विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. तिचे सोने करा, असे अावाहन विद्यार्थिनींना केले.