आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील तीन सर्पमित्रांचा अपघाती मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील तीन तरुण सर्पमित्रांचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. ही दुर्घटना मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याजवळील नवकार व्हीलसमोर घडली. सर्पविहार संस्थेचा संस्थापक समीर वैद्य, हर्षल निकुंभ आणि सुयोग आळंदे अशी मृतांची नावे आहेत.

रविवारी रात्री मालेगाव रस्त्यावरील खासगी रुग्णालयात साप निघाल्याची माहिती कळाल्याने समीर, हर्षल आणि सुयोग हे रुग्णालयात गेले होते. मोठ्या हिमतीने साप पकडून त्यांनी लळिंग कुरणात सोडला. तेथून धुळ्याकडे परत येताना, त्यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच.18/ एई.88) अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात हर्षल राजेंद्र निकुंभ (26) हा जागीच ठार झाला. तर समीर जयंत वैद्य (33) आणि सुयोग सुधीर आळंदे (26) हे दोघे दुभाजकाजवळ अत्यवस्थ अवस्थेत पडले होते. याचवेळी धुळ्याकडे परतणाºया भाजपच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना माहिती दिली, रुग्णवाहिकाही मागवली. हर्षलचा श्वासोच्छवास बंद पडला होता, तर समीर आणि सुयोग यांची हालचाल सुरू होती; परंतु त्यांची ओळख पटणे जिकिरीचे होते. दरम्यान, रुग्णालयात नेण्यापूर्वीच या दोघांचीही प्राणज्योत मालवली.

तीनही युवक अविवाहित
मृत तिघेही अविवाहित होते. सुयोगला पर्यावरणाविषयीचा पुरस्कार मिळाला होता. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालेला समीर गृह उद्योग चालवतो. समीरप्रमाणे हर्षलही एकुलता एक होता. तो एलएलबीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता.