आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snehasammelan Effective Patil, Rahul Patil Received The \'Best Studanta\' Award

स्नेहसंमेलन- प्रभावती पाटील, राहुल पाटील यांना मिळाला ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मूजे महाविद्यालयात ‘चैतन्य 2014’ या स्नेहसंमेलनाला आजपासून सुरवात झाली. त्यात मुल्जियनने अंगीभूत असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्य, नाट्य, संगीत यांची सांगड घालत तरुणांनी धमाल केली. तरुणाईच्या उत्साहास उधाण आले होते. नो लेक्चर, नो टेन्शनच्या मूडमध्ये पुरेपूर आनंद लूटला.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डी.एड. कॉलेजच्या प्राचार्य एस.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल राव, उपप्राचार्य एन.व्ही. भारंबे, संमेलनाध्यक्ष पी.टी.चौधरी, डॉ. देवयानी बेंडाळे, ए.ओ.उबाळे, दक्षता समितीचे चेअरमन आर.आर.अत्ततरदे आदी उपस्थित होते. रविवारी स्नेहसंमेलनाचा समारोप होईल. या वेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची नावेदेखील जाहीर करण्यात आली.

सर्वत्कृष्ट विद्यार्थ्यांची नावे जाहीर

महाविद्यालयातर्फे बेस्ट स्टुडंट ऑफ दी इअरचा पुरस्कार प्रभावती पाटील (तृतीय वर्ष कला) हिला आणि राहुल पाटील (तृतीय वर्ष विज्ञान) यास देण्यात आला. तर प्रिन्सीपल स्पेशल ऑनर पुरस्कार वरिष्ठ महाविद्यालयाची रचना कुळकर्णी (तृतीय वर्ष विज्ञान), जास्मिन गाजरे (द्वितीय वर्ष वाणिज्य), तृप्ती तायडे (तृतीय वर्ष कला),मयूर लांजूळकर (तृतीय वर्ष, ललित कला विभाग), हार्दिक तुरखिया (तृतीय वर्ष बीसीए), कनिष्ठ महाविद्यालयाची राधा राजहंस (11 वी, वाणिज्य), यशस्विनी त्रिपाठी (12 वी, कला शाखा), राकेश पाटील (12 वी, विज्ञान) यांना देण्यात आला.

अनेक कलाप्रकारांच्या स्पर्धा

यात संस्कार भारतीच्या रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, पाण्यातील रांगोळी, मुक्तहस्त रांगोळी, पोस्टर रांगोळी काढण्यात आल्या. सलाद डेकोरेशन, फ्रेश फ्लॉवर अँरेंजमेंट, भारतीय पारंपरिक वेशभूषा, फुलांचा गालिचा, पूजाथाळी सजविणे, रेखाचित्रे यांची स्पर्धा घेण्यात आल्या. मेंदीमध्ये दुल्हन, अरेबियन प्रकारच्या मेंदी तरुणींनी काढल्या. लेखक जागविणे आणि जगविणे, राजकारणातील युवक, वृद्धार्शमातील वाढती संख्या, अंधर्शद्धा निर्मूलन, अध्यात्म आणि विज्ञान, तरुणांची आत्महत्या, मिशन 2020 या विषयांवर कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच काव्यवाचन, अभिवाचन, उत्स्फूर्त भाषण सारख्या स्पर्धा पार पडल्या. एकांकिका, चमक दिखला स्पर्धांमध्येही तरुणाईने सहभाग नोंदविला.

खेळांची मजा

हसून हसून लोटपोट होणार्‍या खेळांची मजा लुटण्यात आली. यात फुगे फुगवणे, रस्सीखेच, मटकी फोड, पीठातून नाणे शोधणे यासारखे खेळ खेळण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चव फूड फेस्टिव्हलद्वारे चाखण्यात आली. यात पाणीपुरी, मुगाची भजे, पॉपकॉर्न, दहीपुरी, दाबेली, ब्रेड रोल, पावभाजी, मंच्युरीयन, पेस्ट्री, भेळ, रगडा, खाकरा, गुजराथी पारस खाकी सारख्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.

कंटेम्प्ररीपासून आदिवासी नृत्य

समूह व एकल नृत्य स्पर्धेला सुरुवात होताच विद्यार्थ्यांनी धमाल केली. गणपती नृत्य मोरया या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात ‘चल हट चल फिर मिलने का मांग ना मुझसे वादा’ हे सेमी क्लासिकल राजस्थानी प्रकारच्या गाण्यावर नृत्य तसेच व्यसनाचे धोके, होणारे दुष्परिणाम तरुणांनी टाळायला हवे हे सांगत ‘मर जाऊ या जी लू जरा’ गाण्यावर नृत्य करण्यात आले. भरतनाट्यमचे उत्तम सादरीकरण दोन तरुणींनी केले. त्यानंतर कोकणी बाल्या नृत्य गणा धाव मना पाव रे, रीमिक्स, अस्सल आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. अपलम चपलम, पत्थर के सनम सारख्या गाण्याने तरुणांच्या गृपने फक्त हावभावांद्वारे नृत्यातून एकाच ठिकाणी थांबून आपल्या प्रेमाबाबतच्या भावना व्यक्त केल्या. हातांच्या अँक्शनद्वारे टीव्हीवरील नृत्याचा गाजत असलेला हा प्रकार त्यांनी सादर केला. फॅन्सी ड्रेस स्पर्धासुद्धा घेण्यात आली.