आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Institutions Purchased Draught Animals In Jalgaon

सामाजिक संस्थांकडून भाकड जनावरे खरेदी, शेतक-यांशी संस्थांचे पदाधिकारी करणार चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कसाई संघटनेने 12 फेब्रुवारीपासून जनावरांच्या कत्तलबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या गुरांच्या बाजारात एकही जनावराची खरेदी-विक्री झाली नाही. याचा फटका जनावरे विक्रीसाठी आणणा-या शेतक-यांना बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी त्यांच्याकडील जनावरे सामाजिक संस्था खरेदी करणार असू्न ते त्यांचे संगोपन करणार आहे.
गत आठवड्यात कसाई संघटनेने घेतलेल्या निर्णयामुळे जनावरांची कत्तल रोखण्यास मदत हाेणार अाहे. शनिवारी सुमारे २०० भाकड जनावरे शेतकऱ्यांना परत घेऊन जावी लागली होती. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत ही जनावरे खरेदी संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या अनुषंगाने शनिवारी गुरांच्या बाजारात जाऊन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे गोरक्षक समितीचे अजय ललवाणी यांनी सांगितले.
500 गायींच्या संगोपनाची तयारी
पांजरपोळसंस्था गायी किंवा जनावरांची खरेदी नाही करू शकत, पण शहरातील कोणत्याही सामाजिक संस्था, व्यक्तींनी जनावरे आणून दिल्यास त्यांचे संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी संस्था उचलू शकते. सुमारे ५०० गायी जरी आणून दिल्या तरी आम्ही त्यांचे संगोपन करू, असे पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार काबरा यांनी सांगितले.
100 गायी घेणार!
बाफनागोशाळेचे संचालक पप्पू बाफना यांनी १०० भाकड गायींची खरेदी संगोपनाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देता आपण विक्रीस येणाऱ्या भाकड गायी खरेदी करणार असल्याचे बाफना यांनी सांगितले.
पुढेही प्रकल्प राबवणार
श्रीजैन नवयुवक मंडळाचे अध्यक्ष प्रितेश चोरडिया आणि माजी अध्यक्ष रिकेश गांधी यांनी संपर्क साधून २१ गायी खरेदी करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या आगामी कार्यकाळात हा प्रकल्प राबवला जाणार अाहे. येत्या शनिवारी गुरांच्या बाजारातून या गायींची खरेदी करण्यात येणार असल्याचे गांधी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.