आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना सल्ला, चुकीच्या पोस्टमुळे मनस्ताप शक्य, दक्षता घ्या, पोलिस निरीक्षक बळीराम हिरेचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल : सोशल नेटवर्क वापरताना कोणतीही पोस्ट कॉपी-पेस्ट किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी ती काय आहे?, तिच्यावर तुमची पूर्ण खात्री आहे का? किंवा त्या पोस्टमुळे वैयक्तिक, सामाजिक भावना दुखावणार तर नाहीत, याचे भान तरुणांनी ठेवावे. अन्यथा एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन कुटुंबालादेखील नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते, असा सल्ला पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिला. पोलिस स्थापना सप्ताहानिमित्त बुधवारी (दि.४) येथील महाविद्यालयात ते बोलत होते. 
 
पोलिस स्थापना सप्ताहानिमित्त यावलमध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात ‘पोलिसांकडून नागरिकांच्या अपेक्षा नागरिकांचे कर्तव्य’ या विषयावर बुधवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एफ. एन. महाजन अध्यक्षस्थानी होते.
 
निरीक्षक बळीराम हिरे यांनी मार्गदर्शन करताना, पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. तसेच सोशल नेटवर्कवरील एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे काय परिणाम होऊ शकतात? ग्रुप अॅडमिनवर काय कारवाई होऊ शकते? याची माहिती दिली. प्राचार्य महाजन यांनीदेखील प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक भान राखणे गरजेेचे आहे. सोशल मीडियाचा सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. अफाक शेख, उपप्राचार्य एम. डी. खैरनार, उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, उपप्राचार्य एस.पी.कापडे, प्रा.अर्जुन पाटील उपस्थिती होते. 
 
बातम्या आणखी आहेत...