आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेविकांनी लावले अल्पवयीन मुलाचे लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -शहरातीलकाही तथाकथित समाजसेविकांनीच अल्पवयीन मुलाचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेतली असून, चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनेचे पत्र पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. तपासानंतर त्या स्वयंघाेषित समाजसेविका कोण? याचा लवकरच उलगडा होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
वराड (ता. एरंडाेल) येथील एका मुलीचे मुसळी (ता. धरणगाव) येथील मुलाशी प्रेमसंबंध हाेते. या प्रेमीयुगुलाचे तथाकथित समाजसेविकांनी जुलैला शहरातील बळीराम मंदिरात वैदिक पद्धतीने लग्न लावले. समाजसेविकांच्या मदतीनेच या प्रेमीयुगुलाने शाहुनगरात भाड्याने खाेली घेतली हाेती. मात्र, लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच िदवशी म्हणजे जुलैला पतीने ‘आईला भेटून तसेच संसारोपयोगी साहित्य घेऊन येतो’, असे सांगत नववधूला सोडून काढता पाय घेतला होता. दोन दिवस उलटूनही आपला पती घरी आल्याने त्या नववधूने पती हरवल्याची शहर पोलिसांत नोंद केली होती.

धमकीदेऊन केले लग्न
अल्पवयीनमुलगा अाणि त्याचे वडील पाेलिस उपअधीक्षक पाडवी यांना भेटले. तेथून ते शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांचा जबाब घेतला. जबाबात त्या अल्पवयीन मुलाने इच्छेविरुद्ध लग्न केले असून काही समाजसेविका वेळोवेळी गुन्हे दाखल करण्याच्या फोनवरून धमक्या देत असल्याचाही उल्लेख केला अाहे. त्याच्याकडून जबाब लिहून त्याला शनिवारी पालकांच्या ताब्यात दिले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना
अल्पवयीनमुलाच्या वडिलांनी १० जुलै रोजी पोलिस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत अग्रवाल यांनी पोलिस अधीक्षकांना संबंधित समाजसेविकांची चौकशी करण्याचे पत्र दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

वडिलांनी दिले पुरावे
पोलिसांचातपास सुरू असताना एका समाजसेविकाने मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन ‘आपण माहिती जाणून घेण्यासाठी आलो अाहाेत’, असे सांगत पोलिस चौकशीचा आव आणला. मात्र, मुलाच्या वडिलांना त्याचा संशय अाला. त्यांनी शनिवारी गृह िवभागाचे पाेलिस उपअधीक्षक िकशाेर पाडवी यांची भेट घेतली त्यांना मुलगा अल्पवयीन असतानाही समाजसेविकांनी लग्न लावलेच कसे? असा प्रश्न िवचारला.