आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोसायटी‍ निवडणूकीत सीआरएमएसचा दारुण पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सेंट्रल रेल्वे एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड (ईसीसी बॅँक)च्या निवडणुकीत एनआरएमयू व एससीएसटी असोसिएशनच्या संयुक्त पॅनलने 35पैकी तब्बल 32 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विभागातून 18, तर भुसावळातून 14 जागा या पॅनलने जिंकल्या. रेल कामगार सेनेला दोन व सीआरएमएसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुसर्‍या दिवशी अर्थात शुक्रवारी पहाटे चार वाजता पूर्ण झाली, हे विशेष! एका जागेसाठी दोन उमेदवारांच्या मतांमध्ये फक्त 27चा फरक असल्याने फेरमतमोजणी करण्यात आली.
ईसीसी बॅँकेच्या निवडणुकीत कधी नव्हे, एवढी चुरस या वेळी होती. सर्वच उमेदवारांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केल्यामुळे विभागात 76.52, तर भुसावळात 71.16 टक्के मतदान झाले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा वरिष्ठ कार्मिक अधिकारी एस. बी. लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वेच्या र्शीकृष्णचंद्र सभागृहात सहा टेबलवर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

चार टेबलवर भुसावळची व दोन टेबलवर विभागाची मतमोजणी झाली. विभागाची 18 जागांची मतमोजणी रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण झाली. मात्र, भुसावळ शहरातील 17 जागांची मतमोजणी शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत चालली. रेल्वेचे 45 कर्मचारी व पाच अधिकारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले होते. पहाटे चार वाजता संपूर्ण निकाल जाहीर करण्यात आला. एनआरएमयू व एससीएसटी असोसिएशनने 31 जागांवर विजय मिळवून गेल्या सहा दशकांपासून बॅँकेवर असलेले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.