आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंदूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू)
जळगाव- इंदूर येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या सात खेळाडूंची निवड झाली आहे. पुरुष संघात चौघांचा तर महिला संघात तिघांची निवड झाली आहे.
इंदूर येथे साॅफ्टबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची पश्चिम विभागीय अजिंक्यपद स्पर्धा ते जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा पुरुष महिला संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी नागपूर येथे सराव शिबिर सुरू आहे.
पश्चिम विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या सातही खेळाडूंच्या निवडीबद्दल अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पी. ई. पाटील, डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, किशोर चौधरी, डॉ. सूरज येवतीकर, एन.डी. पखले, नितीन पाटील, प्रा. उदय नाईक यांनी स्वागत केले आहे.

या खेळाडूंची झाली निवड
राज्यपुरुष संघात जळगावचा मू.जे.महाविद्यालयाचा सुमेध तळवेलकर, कल्पेश कोल्हे, जयेश मोरे प्रितेश पाटील यांची निवड झाली आहे. तर महिला संघात डॉ. अनुष्का चौधरी, जयश्री चौधरी, छाया बेंडाळे यांचा समावेश आहे.
प्रितेश पाटील
सुमेश तळवळकर
कल्पेश काेल्हे
जयश्री चाैधरी
जयेश माेरे
अनुष्का चाैधरी
छाया बेंडाळे