आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे संशोधन: सुरक्षा, सुविधा, बचत एका क्लिकवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर प्रोजेक्टद्वारे सुरक्षा, सुविधा, बचतीसह विविध कामे एका क्लिकवर सोपी करून संशोधनाचा आविष्कार घडवला.

मूळजी जेठा महाविद्यालयात इम्पॅक्ट या राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. त्यात एटीएमची सुरक्षा, वीजेच्या बचतीसह अंधांना इच्छितस्थळी जाणे सोपे करणारी यंत्रणा यासह विविध 33 संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. डॉ.जी.डी. बेंडाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. यंदा या स्पध्रेचे सहावे वर्ष आहे. या वेळी एनसीसीटीएसडी (नॅशनल कॉन्फरन्स ऑन करंट ट्रेंड्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) या राष्ट्रीय परिषदेलाही सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांना शिक्षकाची साथ हवी
सध्याच्या युगात सॉफ्टवेअर क्षेत्र हे सर्मपण, गुणवत्ता आणि कटिबद्धता या त्रिसूत्रीने अधिक प्रभावी करता येईल. त्यासाठी उत्तम शिक्षकाची साथ विद्यार्थ्यांना मिळायला हवी, ज्यातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे मत पुणे येथील फग्यरुसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व्ही. के. वाघ यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा महाविद्यालयात शुक्रवारपासून सुरू झालेल्या एनसीसीटीएसडी राष्ट्रीय परिषद व इम्पॅक्ट या राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पध्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्राचार्य अनिल राव, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक व्ही. आर. रवंदे, डॉ. ओ. एच. महाजन, हेमलता पाटील, डॉ. के. बी. महाजन उपस्थित होते.

ऑनलाइन लायब्ररी मॅनेजमेंट आणि डीएलआरडीसी
जोगळेकर आणि मू.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र प्रोजेक्टमध्ये ग्रंथालयांच्या कामकाजाचे नियोजन सुचविण्यात आले आहे. जोगळेकर महाविद्यालयातील केतन काटदरे आणि पराग गोगटे यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयातील ग्रंथालयात पुस्तकांची माहिती, मोफत डाउनलोडिंग आदींचा समावेश ग्रंथालयात आहे. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या भाग्यर्शी पाटील आणि स्नेहा शिंदे यांनी तयार केलेल्या डीएलआरडीसीमध्ये ई- बुक सिस्टीम वापराबद्दलची माहिती दिली आहे.

डिजिटल फ्लोरा
बॉटनीच्या विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची माहिती घेण्यासाठी अनेक पुस्तके चाळावी लागतात. त्यासाठी वाया जाणारा वेळ भरून काढण्यासाठी जोगळेकर महाविद्यालयाच्या जयेश म्हसकरने डिजिटल फ्लोरा नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात त्याने वेगवेगळ्या 100 वनस्पतींची माहिती संग्रहित केली आहे, जी एका क्लिकवर उपलब्ध होईल.

एटीएमचा गैरवापर रोखणारी प्रणाली
रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रिया कसालकरने एटीएमच्या सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात एटीएम कार्डधारकाचा पासवर्ड आवाजाने स्वीकारला जाईल. जर आवाज मॅच झाला नाही तर पुढील प्रक्रिया होणार नाही. एटीएम कार्डाचा गैरवापर रोखण्यात हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरणारे आहे.

‘ब्लाइंड पर्सन नेव्हिगेशन’
अंध व्यक्तीला दुसर्‍याच्या मदतीची गरज पडू नये, यासाठी ‘ब्लाइंड पर्सन नेव्हिगेशन’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यात मोबाइलमध्ये विशिष्ट प्रकारचे अँप्लिकेशन डाउनलोड केले आहे. परिसराचे नाव मोबाइल समोर उच्चारल्यानंतर त्याला मोबाइल पत्ता सांगेल. जोगळेकर महाविद्यालयाच्या र्शावणी नाईकने ही प्रणाली विकसित केली आहे.

वीज बचत करणारे ‘लॅब ऑटोमेशन’
महाविद्यालयांच्या प्रयोगशाळेतील कामकाजात सुसूत्रता आणणारे हे सॉफ्टवेअर आहे. विशेष म्हणजे यातून विजेची बचत साध्य होणार आहे. प्रयोगशाळेत एका प्रमुख संगणकावर अनेक प्रयोगशाळांचे संगणक जोडलेले असतील. हे प्रमुख संगणक सुरू केल्याशिवाय अन्य संगणक सुरू होणार नाहीत, तसेच ते बंद केल्यानंतर संपूर्ण प्रयोगशाळा बंद होतील. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटी कार्डवरून विद्यार्थ्याची उपस्थिती समजेल. नाशिक येथील के.के. वाघ महाविद्यालयाच्या प्रिन्सी पाटील, अश्विनी शिंदे यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.