आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहमप्रकरणी विशेष तपासाधिकारी नेमण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सोहम जोशी खंडणीप्रकरणी विशेष तपासाधिकाऱ्यांची नेमण्याची मागणी जिल्हा महिला असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी त्यांनी विशेष तपासाधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
महिला असोसिएशनच्या उषा सरोदे, राजकुमारी बाल्दी, हेमलता रोकडे, वासंती दिघे, भारती पाथरकर, योगिता सपकाळे आणि रेखा कुलकर्णी यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. या वेळी त्यांना निवेदन दिले. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत, सोहमचा वैद्यकीय अहवाल अजूनही पोलिसांनी सिव्हिलमधून मागवलेला नाही. त्यामुळे दोषींना जामीन मिळण्यास सोपे होणार आहे. हॉटेल पालखी इंटरनॅशनलचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत नाही. या प्रकरणात अजामीनपात्र जास्त शिक्षा असलेली कलमे पोलिसांनी लावली नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
बातम्या आणखी आहेत...