आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.. जे आयुक्तांचे विरोधक ते देशाचे विरोधक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे ज्या स्टाइलने काम करत आहेत, ते महाराष्ट्रात कोणी केले नाही. काम करताना जे आयुक्तांचे विरोधक तयार होतील ते महापालिका आणि देशाचे विरोधक आहेत, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. आयुक्त गुडेवार यांच्या वाढदिवसानिमिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
गँगरीन कापल्याशिवाय उपाय नाही : 80 टक्के कर्मचारी चांगले आहेत. 10 ते 15 टक्के आयुक्तांनुसार बदलतात, तर पाच टक्के बदलत नाहीत. ते महापालिकेचे गँगरीन आहेत, गॅंगरीन कापल्याशिवाय उपाय नाही, असे म्हणत आयुक्तांनी आपली भूमिका मांडली. वैयक्तिक नव्हे सामूहिक काम करत असतो. लोकहितासाठी निर्णय घेत असताना पर्वा करत नाही, असे ते म्हणाले.
आयुक्तांच्या पाठीशी : आयुक्तांनी एलबीटी वसुली केली त्यावेळी आम्ही त्यांचे सर्मथन केले, असे मनपा सभागृह नेते महेश कोठे म्हणाले. प्रशासन आणि पदाधिकारी हे मनपाची दोन चाके आहेत. आम्ही आयुक्तांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या सोबत 120 स्पीडने आम्ही पळू, असे महापौर अलका राठोड म्हणाल्या.