आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा टाकताच ‘धन्यवाद’ म्हणणारी सौर कचराकुंडी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कचराकुंडीपाहून कुणालाही किळस येते. त्यामुळे कचराकुंडीच्या शेजारून जाणेही कुणी पसंत करत नाही. मात्र, चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या संकेत माळी या विद्यार्थ्याने नागरिकांना आकर्षित करणारी कचराकुंडी तयार केली आहे. शनिवारी मू.जे. महाविद्यालयात आयोजित इम्पॅक्ट या स्पर्धेत त्याने या कचराकुंडीचा डेमो सादर केला.
‘आय टू डस्टबिन’ असे कचराकुंडीचे त्याने नाव ठेवले आहे. त्याने मॉनिटर, सीसीटीव्ही, सेन्सरच्या मदतीने कचराकुंडी तयार केली आहे. कचराकुंडीच्या वर एक मॉनिटर आहे. त्यावर विविध जाहिराती, शासनाच्या योजनांची माहिती, बेटी बचाओ, पर्यावरण या संदर्भातील संदेश दाखवण्यात येणार आहेत. तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला "धन्यवाद' असे ऐकायला मिळेल मॉनिटरवर लेखी दिसणार आहे. त्यामुळे ही कचराकुंडी घाणेरडी नव्हे तर आकर्षक दिसेल, असा दावा माळी याने केला आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंत भरल्यानंतर ती सेन्सरच्या मदतीने संबंधित नियंत्रण कक्षात सूचना देईल. त्यामुळे रिकामी करण्याची प्रक्रिया तत्काळ करता येईल. ही सर्व प्रक्रिया सोलरवर चालणार असल्यामुळे विजेची बचतही हाेईल, असे माळी याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

या इम्पॅक्ट स्पर्धेत ३६ स्पर्धकांनी सहभाग घेऊन अँड्राॅइड अॅप्लिकेशन, सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक चांगली उपकरणे तयार केली होती. यात डीबीजे महाविद्यालयाच्या महेश गुरव विवेक शिंदे यांनी ‘सेफ्टी क्रॅकर’ हे अँड्राॅइड अॅप्लिकेशन तयार केले; त्याच्या मदतीने लांबवर अंतरावरून माेबाइलच्या मदतीने फटाके फोडता येणार आहेत. लहान मुले वृद्धांच्या सुरक्षेसाठी हे अॅप महत्त्वाचे ठरणार अाहे. तसेच रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विराज सरदेशपांडे याने ‘फाइंड मी’ हे अँड्राॅइड अॅप्लिकेशन तयार केले आहे. यात महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती शिक्षकांना मोबाइलवरून कळणार आहे. प्रा. अर्चना चौधरी अंजली जनबंधू यांनी सूत्रसंचालन तर डॉ. लिना ढाके यांनी आभार मानले.
रानमांजरही दुर्मिळ
देशात तीन जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र असून पश्चिम घाट हा त्यातला प्रमुख घाट आहे. खान्देश याच घाटातील भाग आहे. येथील काळवीट, माकड, रानमांजर, वटवाघूळ हे प्राणी तसेच शेवाळ, बुरशी, लायकन ब्रायो फाइट्स या वनस्पतींच्या सूक्ष्म प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे खेलकुटे यांनी स्पष्ट केले.

प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
सह्याद्री पश्चिम घाटातील काही प्राणी वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे माजी संचालक डॉ. संजीवा खेलकुटे यांनी व्यक्त केले. शनिवारी मू.जे. महाविद्यालयात ‘रिसेंट अॅडव्हान्स इन किमो अॅण्ड बायो सायन्सेस’ या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ‘इम्पॅक्ट’ या राष्ट्रीय स्पर्धा प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केसीई सोसायटीचे सहसचिव किरण बेंडाळे, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या पॉलिमर विभागाच्या संशोधक डॉ. भास्कर इदगे, उमविच्या संगणक प्रशाळेचे संचालक डॉ. बी.व्ही.पवार, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद गोरे, प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, डॉ. आर.टी.महाजन, डॉ. के.बी.महाजन, उपप्राचार्या डॉ. देवयानी बेंडाळे उपस्थित होते.