आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेततळ्यांवर लावता येईल कमी क्षमतेचा पंप; जैन उद्योग समूहाचे मॉडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कोरडवाहू शेतक-यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणारे सौरऊर्जा प्रकल्पाचे मॉडेल जैन उद्योग समूहाने विकसित केले आहे.
स्वीडनची राजधानी स्‍टॉक होम येथे आयोजित वर्ल्ड वॉटर सप्ताहामध्ये या एकात्मिक सौरऊर्जेवर चालणारे सूक्ष्म सिंचनाच्या मॉडेलचे लोकार्पण करण्यात आले आहे. या उपक्रमात शेततळ्यांवर सौर ऊर्जा कृषिपंप बसवण्यात येणार आहेत.
सिंचन, विजेची व्यवस्था नसलेल्या छोट्या शेतक-यांना पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नसतो. अशा शेतक-यांनी त्यांच्या शेतात शासकीय योजनेतून शेततळे खोदून त्यावर सौरपंप लावून सिंचन करता येईल. शेतातील वाहून जाणारे पाणी शेतातच अडवून त्यातून शेताची सिंचनाची व्यवस्था केली जाईल. तर सौरपंपामुळे विजेची गरज भासणार नाही. जैन उद्योग समूहाने राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजराथ या राज्यांत पाच हजार सेट शेतक-यांच्‍या शेतात लावले आहेत. ते यशस्वी झाल्यानंतर या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून ही योजना यशस्वी झाली आहे.

अल्पभूधारक शेतक-यांना फायदा
अल्‍प‍भूधारक हा प्रकल्प फायद्याचा ठरणार आहे. सौरपंपामुळे विजेच्या बाबतीत शेतक-यांचा प्रश्न मिटेल, विहिरींऐवजी शेततळ्यामुळे दोन पिके घेता येतील. सूक्ष्म सिंचनामुळे पिकांना पाणीदेखील कमी लागणार असल्याने निश्चितपणे उत्पादनात वाढ होईल. सौरपंपाच्या किमती आवक्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अशोक जैन, उपाध्यक्षजैन उद्योग समूह.