आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेवर चालणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राची निर्मिती, मोबाइल चार्जिंग एक एलईडी बल्बची व्यवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गोदावरी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या जलशुद्धीकरण यंत्राची निर्मिती केली आहे. यंत्रात १५ लिटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता, मोबाइल चार्जिंग एक एलईडी बल्ब लावण्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे. तसेच दुर्गम भागात जेथे वीज उपलब्ध नाही त्या ठिकाणी पूरग्रस्त भाग, तसेच सैन्य दलाच्या छावण्यांच्या ठिकाणी हे यंत्र अत्यंत उपयोगी ठरणार आहे. 
 
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या मनोज हेमंत फालक, पीयूष दिनकर कुरकुरे, निखिल अनंता भंगाळे, विपुल सुनील देशमुख या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. अतुल बऱ्हाटे, प्रा. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार यंत्राची निर्मिती केली. या यंत्रात पाणी साठवण्याची क्षमता ही १५ लिटर एवढी असून मोबाइल चार्जिंग एक एलईडी बल्ब लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 बॅटरी बॅकअप चांगला असल्याने रात्रीदेखील उपयोगात येऊ शकणारे हे यंत्र पोर्टेबल लहान साइजमध्ये आहे. दुर्गम भागात जेथे वीज उपलब्ध नाही त्या ठिकाणी आणि पूरग्रस्त भाग, तसेच सैन्य दलाच्या छावण्यांच्या ठिकाणी हे यंत्र अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
 
 प्रायोगिक तत्त्वावर तयार केल्या या यंत्रासाठी सुमारे २० हजार रुपये खर्च लागला आहे. याच सर्किटचा वापर करून मोठ्या प्रमाणात, आकारात यंत्र तयार करता येऊ शकते, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्ही. जी. अराजपुरे, उपप्राचार्य प्रवीण फालक यांनी या विद्यार्थी प्राध्यापकांचे प्रयोगाबद्दल काैतुक केले आहे.
 
महाविद्यालयात वापर सुरू 

विद्यार्थ्यांनी तयार केलेले जलशुद्धीकरण यंत्र महाविद्यालयात बसवण्यात आले आहे. यामुळे वीज बिल वाचवण्यासाठी मदत हाेत अाहे. या यंत्रात इनव्हर्टर वापरल्यामुळे डीसी टू एसी सप्लाय करण्याची गरज भासत नाही. 
 
तीन महिन्यांत तयार झाले यंत्र 
जलशुद्धीकरण यंत्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिने कालावधी लागली आहे. यात पहिले दोन महिने पेपरवर्क केले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात यंत्र तयार करून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...