आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांच्या काॅलनीत असुविधा; अायुक्तांची अभियंत्यांना नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : अामचेपती देशाच्या सीमेवर तैनात अाहेत. शेकडो किलोमीटर लांब असल्याने अामच्या कॉलनीतील रस्ते, गटारी स्वच्छतेच्या समस्या मांडण्यासाठी ते महापालिकेत येऊ शकत नाही. नगरसेवकांकडे गेलाे तर ते दुर्लक्ष करतात. अाम्ही देखील कर भरताे. परंतु त्याबदल्यात अाम्हाला अस्व्छता, खराब रस्ते मिळाले अाहेत.
 
 डासांची उत्पत्ती वाढल्याने लहान मुले तापाने फणफणत अाहेत, अशा शब्दात मंगळवारी दुपारी व्दारकानगरातील सैनिकांच्या पत्नींनी अायुक्तांकडे धाव घेत संताप व्यक्त केला. यापूर्वीच प्राप्त तक्रारीचा निपटारा केल्याने शहर अभियंता यांना दंड करण्याबाबतची नाेटीस बजावली अाहे. आहुजानगराजवळ व्दारकानगर अाहे.
 
 या परिसरात शेकडो घरांची वस्ती अाहे. महापालिका क्षेत्रात असल्याने पालिकेचे घरपट्टी पाणीपट्टीदेखील दरवर्षी नियमित भरली जाते. विशेष म्हणजे या भागातील रहिवासी हे माेठ्याप्रमाणात सैनिक असून ते देशाच्या सीमेवर वेगवेगळ्या प्रदेशात कार्यरत अाहेत.
 
सुटी नसल्याने ते वर्षातून काही दिवसच घरी येतात. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांच्या समस्या मांडण्यासाठी अाम्हालाच पालिकेत यावे लागत असल्याची भूमिका महिलांनी मांडली.
गेल्या पाच वर्षांपासून व्दारकानगरात सांडपाण्याचा निचरा, गटारींची व्यवस्था नाही.
 
रस्त्यांचे अजूनही डांबरीकरण करण्यात अालेले नाही. विशेष म्हणजे या भागात कचराकुंडी नसल्याने उघड्यावर कचरा टाकावा लागताे. यासर्व परिस्थितीमुळे डासांची उत्पत्ती वाढली अाहे. लहान मुलांना डास चावल्याने आजारपणात वाढ झाली अाहे. अाम्हीही कर भरताे मग सुविधा का मिळत नाही? अशीच परिस्थिती राहिल्यास अाम्ही कर का भरावा, असा सवाल महिलांनी केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...