आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यात शहरात सुरू होणार लष्कराची कॅन्टीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी जळगावात लष्कराची कॅन्टीन सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. या मागणीला नुकताच हिरवा कंदील मिळाल्यामुळे दोन महिन्यात शहरातील महाबळ रस्त्यावरील सैनिकी भवनात कॅन्टीन सुरू होणार असून त्यादृष्टीने कामकाज हाती घेण्यात आले आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार आहे.
नाशिक, धुळेनंतर जळगावात
सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांना शासनाच्या सैनिकी विभागातर्फे विविध गृहपयोगी वस्तू अल्पदरात दिल्या जातात. जिल्ह्यातील सैनिकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सध्या भुसावळ येथील सैनिक कार्यालयातील कॅन्टीनमध्ये जावे लागते. जळगावातदेखील या सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी लष्करी कॅन्टीन उभारण्यात येत आहे. जळगाव पूर्वी धुळे, नाशिक येथे कॅन्टीन सुरू करण्यात आली, असे माजी सैनिक कल्याण अधिकारी मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.
हा होणार फायदा
लष्करी कॅन्टीन शहरात आल्यामुळे मध्यवर्ती व जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जवानांना हे ठिकाण सोईस्कर होणार आहे. जवानांना घरगुती वस्तूंसह साबण, तेल, फरफ्युम आदी वस्तू कमी दरात मिळणार आहेत. सैनिकी भवनात साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तीन ते चार खोल्या काढून ही सुविधा दिली जाणार आहे.