आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: जमीन विकून पैसे द्या, असे म्‍हणत अक्षय्यतृतीयेलाच मुलाने केला बापाचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपाळ तुकाराम माळी यांची हत्‍या झाल्‍याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. - Divya Marathi
गोपाळ तुकाराम माळी यांची हत्‍या झाल्‍याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.
बोदवड - जमीन विक्री करून पैसा द्या, या मागणीसाठी पोटच्या मुलाने अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच बापाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बोदवडमध्ये शुक्रवारी उघडकीस आला.. याप्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. 
 
शुक्रवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बोदवड शहरातील डॉ. आंबेडकर चौकातील राज रेडिओ या दुकानाच्या मागे अनोळखी पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला परिसरातील नागरिकांना दिसला. याप्रकरणाची नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिस तात्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी केलेल्‍या चौकशीत हा मृतदेह शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील रहिवासी गोपाळ तुकाराम माळी (वय ५२) यांचा असल्याचे समोर आले.
 
याप्रकरणी दुपारी बोदवड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली. माळी यांचे डोके आणि चेहऱ्यावर वार केल्याच्या जखमा होत्या. यामुळे सकाळी 11 वाजता घटनास्थळी पोहोचलेले डीवायएसपी समीर शेख यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. डीवायएसपी शेख यांनी मृत गोपाळ पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेतल्यानंतर घटनाक्रम उलगडण्यास सुरुवात झाली. 
 
मृत माळी यांचा मुलगा दीपक (वय ३०) आणि स्वत: गोपाळ माळी हे गुरुवारी रात्री सोबत होते तसेच दोघांनी सोबत मद्यपानही केले होते, असे तपासात समोर आले. यामुळे पोलिसांनी दिपकला ताब्यात घेवून चौकशी केली. दीपकला पोलिस खाक्‍या दाखवताच त्‍याने गुन्‍ह्याची कबूली दिली. बोथट हत्याराने गुरुवारी रात्री वडिलांची हत्या केल्याचे दिपकने सांगितले.
दरम्यान, दुपारी २ वाजता गोपाळ माळी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आरती मनोज चौधरी (रा.नेरी नाका, जळगाव) यांनी वडिलांची हत्या केल्याप्रकरणी भाऊ दीपकविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास डीवायएसपी समीर शेख करत आहेत.
 
वादाचे कारण असे
आरोपी दीपक हा, मृत गोपाळ माळी यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. गोपाळ माळी यांच्या पहिल्या पत्नीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुली, एक मुलगा आहे. मात्र, मनूर शिवारातील वडिलोपार्जित जमीन विक्री करून मला पैसे द्या, असा तगादा दीपक नेहमी लावत होता. यावरुन खटके उडाल्याने आखाजीच्या दिवशीच तुमची घागर भरतो, असा गर्भीत इशारा त्याने बापाला दिला होता. याच वादातून पुढे हत्याकांड घडले.
बातम्या आणखी आहेत...