आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: पोटच्याच गोळ्याने केली आईची दुर्दैवी हत्या; साक्री तालुक्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी रायमल दुर्जन देसाई... - Divya Marathi
आरोपी रायमल दुर्जन देसाई...
पिंपळनेर: साक्री तालुक्यातील टेंभे या आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या एका महिलेचा स्वतःच्याच मुलाने दगडाने ठेचून खून केल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत आरोपीचा भाऊ सायमल दुर्जन देसाई (वय-३२) याने रायमल दुर्जन देसाई (वय-२५) याच्याविरोधात पिंपळनेर पोलिसांत तक्रार केली असता आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी सपोनि सुनील भाबड व पोउनि योगेश खटकळ यांसह सहकाऱ्यांनी वेगाने तपास सुरू करून पोलिसांनी चौकशीकरिता रायमल यास ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मातेचा खून केल्याची कबुली दिली व सदर धक्कादायक बाब समोर आली.
 
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दिनांक २१ वार रविवार रोजी १२ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील टेंभे या आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या अहिलुबाई दुर्जन देसाई (वय-५०) यांच्या  डोक्यावर स्वतःच्या लहान मुलाने दगड आपटून जन्मदात्या आईला जिवे ठार मारले. खून का केला?याचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.दरम्यान पोलिसांनी रायमल दुर्जन देसाई रा. टेंभे ता. साक्री याच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी निलेश सोनवणे हे करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...