आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईला निरोप देऊन परतताना एसटीखाली चिरडून मुलगा ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसस्थानकात शिरण्यापूर्वीच अपघाताच्या आवाजाने तुषारच्या आईने मागे पाहिले. पाहते तर काय, क्षणभरापूर्वीच निरोप दिलेला मुलगा रस्त्यावर निपचित पडला होता. हे पाहून ही माउली हताश होत रस्त्यावरच सुन्न होऊन बसली. लोकांनी सावरल्यानंतर तिने पतीला फोन लावला. त्या वेळी तिच्या तोंडातून लवकर शब्दही फुटत नव्हता. - Divya Marathi
बसस्थानकात शिरण्यापूर्वीच अपघाताच्या आवाजाने तुषारच्या आईने मागे पाहिले. पाहते तर काय, क्षणभरापूर्वीच निरोप दिलेला मुलगा रस्त्यावर निपचित पडला होता. हे पाहून ही माउली हताश होत रस्त्यावरच सुन्न होऊन बसली. लोकांनी सावरल्यानंतर तिने पतीला फोन लावला. त्या वेळी तिच्या तोंडातून लवकर शब्दही फुटत नव्हता.
जळगाव - मयूर काॅलनीत लग्नकार्यासाठी अालेल्या अाईला बसस्थानकाजवळ साेडून पुन्हा लग्नस्थळी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला एसटीची धडक बसल्याने ताे मागील चाकाखाली अाला. यात तरुणाच्या डाेक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जर त्याने हेल्मेट वापरले असते तर त्याचा जीव वाचला असता. ही घटना रविवारी दुपारी २.४५ वाजता नवीन बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पाेलिस ठाण्यात एसटीचालकावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. मृत तरुण हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अाहे.

शिवसेनेचे कुलभूषण पाटील यांचा भाऊ पंकज पाटील याचे रविवारी पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत लग्न हाेते. त्या लग्नासाठी तुषार अरुण पाटील (वय २३, रा.लाेहटार, ता.पाचाेरा) त्याची आई रत्नाबाई अरुण पाटील हे दोघे गेलेले हाेते.

लग्न साेहळा आटोपल्यानंतर दुपारी २.४५ वाजता तुषार आईला बसस्थानकावर साेडण्यासाठी मित्राच्या दुचाकीने (एमएच-१९-बीएक्स ३११३) अाला हाेता. नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिराजवळील रिक्षा थांब्याजवळ तुषारने आईला उतरवले. अाई बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ पाेहोचल्यानंतर त्याने अाईला हात देऊन लग्नस्थळी जाण्यासाठी दुचाकी वळवली. याच वेळी स्वातंत्र्य चौकाकडून चोपडा एसटीने (एमएच-२०-बीएल-२५३९) बसस्थानकात जाण्यास वळण घेत असताना तिचा धक्का दुचाकीला लागला.

त्यामुळे तुषार गाडीच्या मागील चाकाखाली सापडला. या वेळी ताे सुमारे २५ फुटांपर्यंत फरपटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघातात तुषारच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तुषारने जर डाेक्यात हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांनी एम.एस.मलिक यांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. अपघातामुळे बसस्थानकासमोर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.

पुढे वाचा.. शिवसेना कार्यकर्त्यांची धाव, शिवकाॅलनीत रहिवास, तुषारला पाहून अाईचा आक्रोश
बातम्या आणखी आहेत...