आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonawane Murder Case Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशांत सोनवणे खूनप्रकरणी चौघे शरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रशांत सोनवणे खून खटल्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ सहआरोपींपैकी चार जण सोमवारी न्यायालयाला शरण आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विलास नारायण सोनवणे, प्रल्हाद नारायण सोनवणे, विशाल प्रल्हाद सोनवणे आणि संजय मुरलीधर साळुंखे अशी शरण आलेल्यांची नावे आहेत.
महिनाभरापूर्वी ११ जणांना सहआरोपी केल्यानंतर शरण येण्यासाठी सोमवार (२२ सप्टेंबर)पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. या कालावधीत संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दोन्ही न्यायालयांनी जामीन फेटाळल्यामुळे सोनवणे कुटुंबीयांना शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. त्यानुसार हे चौघे सोमवारी शरण आले आहेत.
सहा जणांना मुदत
नगरसेवक कैलास सोनवणे, माजी उपमहापौर भारती सोनवणे, नंदकिशोर सपकाळे, संजय प्रभाकर साळुंखे, सागर सोनवणे आणि जयदीप सोनवणे या सहा संशयितांतर्फे सोमवारी न्यायालयात वकीलपत्र दाखल करण्यात आले. तसेच शरण येण्यासाठी मुदत मागण्यात आली. न्यायालयाने या सगळ्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्याची मुदत दिली आहे.