आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनवणे यांच्या खुनाचा कट पूर्वनियोजित, पंचांची साक्ष पुरावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विनायक सोनवणे यांचा खून आरोपींनी कशा पद्धतीने केला? याबाबत पंचांची साक्ष पुरावे यांच्या आधारे सरकार पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधत खुनाचा कट पूर्वनियोजित असल्याचा युक्तिवाद केला.

आरोपी राजहंस पवन हे लोखंडी कोयता, चाकू ही हत्यारे घेऊन रक्ताने माखलेल्या कपड्यांसह पोलिस ठाण्यात स्वत:हून पोलिस उपनिरीक्षक जमील शेख यांच्या समोर हजर झाले होते. तर जमील शेख यांनी हत्यारांसह आरोपींना ताब्यात घेतले होते.
हत्यारे सुरक्षित प्रशांत पाटील यांच्या समोर ठेवले होते. त्यानंतर त्यांनी आरोपींना जिल्हापेठचे तत्कालीन पोलिस निरीक्षक वाय. डी. पाटील यांच्या समोर हजर केले होते. त्यांनी पंच साक्षीदार प्रशांत पाटील यांच्या समक्ष आरोपींच्या अंगावरील रक्ताच्या डागांवर मार्कर पेनने खुणा केल्या होत्या. हा महत्त्वपूर्ण पुरावा आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध करतो.

७०रुपयांत खरेदी केला कोयता
आरोपीपवन याने राजकमल टॉकीजजवळून चंदाबाई लोहार या महिलेकडून लोखंडी कोयता विकत घेतल्याचे जबाबात सांगितले होते. तर पोलिसांनी पवनला घेऊन राजकमल टॉकीजजवळ गेले असता, त्याने चंदाबाईच्या हातगाडीवर लोखंडी कोयते दाखविले होते. चंदाबाई लोहार या महिलेची साक्ष घेतली असता तिने विनायक सोनवणे यांच्या खुनाच्या पाच ते सहा दिवसांपूर्वी पवनने ७० रुपयांमध्ये कोयता खरेदी केल्याची साक्ष दिली. आरोपी, पंच महिलेची साक्ष पुराव्यास पुष्टी देणारी आहे. आराेपींनी विनायक सोनवणे यांच्या खुनाचा कट रचल्याचे पुराव्यावरून सिद्ध होत असल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाला सांगितले.

घटनेनंतर अमर सोनवणे होता फरार
खूनप्रकरणातील आरोपी अमर सोनवणे हा घटनास्थळावरून धुळ्याला फरार झाला होता. त्याची धुळे येथील बहीण स्वाती पवार यांच्या घरून आरोपीची दुचाकी जप्त करण्यात आल्याचे सरकार पक्षाने सांगितले.