आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonwane Enter In 'top 100' Mp In India, Divya Marathi

देशातील ‘टॉप 100’मध्ये धुळ्याचे खासदार सोनवणे 93व्या स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- इंडिया टुडे ग्रुपने सतर्क नागरिक संघटन आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या दोन अशासकीय संस्थांनी तयार केलेल्या खासदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये धुळ्याचे खासदार प्रताप सोनवणे देशपातळीवर 93 व्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 47 पैकी फक्त 11 खासदारांचा टॉप 100 मध्ये समावेश असून सोनवणे त्यात 9 व्या स्थानी आहेत. केंद्रात मंत्री असलेल्या खासदारांना मात्र सव्र्हेमध्ये कोणतीही रॅकिंग दिलेली नाही.
खान्देशातील खासदार अनुक्रमे माणिकराव गावित, ए.टी.पाटील, हरिभाऊ जावळे आणि प्रताप सोनवणे यांच्या कामगिरीवर आधारित सव्र्हेमध्ये सोनवणे आघाडीवर असून देशात ते 93 व्या स्थानी आहेत. बी.ई.पर्यंत शिक्षण झालेल्या सोनवणे यांनी खासदारकीच्या टर्ममध्ये एकूण 289 प्रश्न विचारले. सभागृहातील त्यांची उपस्थिती 54.2 टक्के आहे. 19 कोटी विकास निधी पैकी त्यांनी 13 कोटी 75 लाखांचा विनियोग केला. तर नेमलेल्या समितीमध्ये त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण 5.9 टक्के राहिले. लोकसभेतील कामगिरीबद्दल त्यांना सव्र्हेमध्ये 6 तर मतदारांचे समाधान या मुद्दय़ावर 6.98 गुण देण्यात आले. शेजारील नंदुरबारमधून केंद्रात मंत्री असलेले माणिकराव गावित यांचा देशपातळीवर रॅकिंगचा उल्लेख नसला तरी गावित यांनी फक्त 149 प्रश्न विचारले. 19 कोटीपैकी त्यांनी 14 कोटी 6 लाख रुपये खर्ची घातले, असे रिपोर्ट कार्डमध्ये म्हटले आहे. सव्र्हेनुसार देशातील टॉप 100 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 47 पैकी केवळ 11 जणांचा समावेश आहे. यात सोनवणे 9 व्या स्थानी आहे. भाजपाचे फक्त हरिश्चंद्र चव्हाण, प्रताप सोनवणे, संजय धोत्रे रिपोर्ट कार्डमध्ये राज्यातून आघाडीवर आहेत.