आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस मुख्यालयासमोर वरातीच्या डीजेचा दणदणाट; २ हजारांचा दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सायलेंट झोन परिसरातून वाजत-गाजत िनघालेल्या मिरवणुकीतील डीजे पोलिसांनी जप्त केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर घडली. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना ‘सायलेंट’पणे मंडपात जावे लागले. सायलेंट झाेनमध्ये बिनधास्तपणे डीजे वाजवला जात असून पाेलिस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ प्रकाशित केले हाेते. याची दखल घेत पाेलिसांनी ही कारवाई केली आहे.

गेल्या महिन्यात पाेलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी ध्वनिप्रदूषणावर ठाेस उपाययोजना म्हणून शहरातील सात ठिकाणे सायलेंट झाेन म्हणून जाहीर केले हाेते. याठिकाणी डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा सूचनादेखील पाेलिसांसह डीजेमालकांना देण्यात आल्या हाेत्या. तरीदेखील सायलेंट झोनमध्ये बिनधास्तपणे डीजे वाजवला जात असल्याकडे मे राेजी ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले हाेते. यात पाेलिस यंत्रणा कसा कानाडाेळा करीत आहे? याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर सुस्त पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

...अन् १०० मीटरपर्यंत निघाली शांततेत वरात
फुकणीयेथील नवरदेवाचे बुधवारी पोलिस मल्टिपर्पज हॉल येथे लग्न होते. त्यासाठी चिमुकले राम मंदिर येथे सिमंती पूजन झाले. त्यानंतर नवरदेवाची घोड्यावर बसून वरात निघाली. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील भाग सायलेंट झोन असतानाही तेथे जाेरात डीजे सुरूच होता. म्हणून जिल्हापेठ पोलिसांनी डीजेचे वाहन जप्त केले. त्यामुळे वरातीला पुढचे १०० मीटर अंतर शांततेतच पार करावे लागले. दरम्यान, डीजेमालक धनराज सपकाळे यांच्याकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल करून त्यांचे डीजेचे वाहन ताब्यात देण्यात आले.

कारवाईत सातत्य हवे
शहरात समारंभात रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवला जाताे. तसेच सायलेंट झाेनचादेखील नियम पाळण्यात येत नाही. या गाेष्टीचा सर्वाधिक त्रास हा गाेलाणी मार्केट परिसर, नवीपेठ, नवीन बसस्थानक परिसर, आर.आर.शाळा परिसर, शिरसाेली राेड, पंचमुखी हनुमान मंदिर, गणेश काॅलनी, पाेस्ट ऑफिससमाेर काेर्ट चाैकातील नागरिकांना हाेताे. पण पाेलिस कारवाई करीत नसल्याने समस्या वाढत आहे. बुधवारी पाेलिसांनी कारवाई केली, ती स्तुत्य असून या कारवाईत सातत्य हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.