आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सपा-राष्‍ट्रवादीच्या नऊ कार्यकर्त्यांच्या जामीनावर सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्‍ट्रवादी कॉँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या समोर हाणामारीचा प्रयत्न केला. या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी समाजवादीच्या चार तर राष्‍ट्रवादीच्या पाच संशयिताना अटक केली होती. शुक्रवारी सर्वांना न्यायाधीश के.आर.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षाने चार दिवसांच्या पोलिस काठडीची मागणी केली होती. मात्र सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज सादर केले असता, पाच हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सर्वांना जामीन देण्यात आला. सुनावणीवेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती.


राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोखंडी, लाकडी रॉड घेऊन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चाल केली होती. मात्र, पोलिसांच्या मध्यस्तीने वाद मिटवण्यात आला होता. रात्री उशिरा पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. या राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे शारीक मलिक, सादिक मलिक, जमील शेख आणि हनीफ शेख तर समाजवादीच्या साजिद शेख, मुफ्ती हारून, साबिर शेख आणि निजाम शेख यांना अटक केली होती. सर्वांना जामीन देण्यात आला आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.हेमंत मेंडकी तर बचावपक्षातर्फे अ‍ॅड.अकिल इस्माईल यांनी काम पाहिले.


नदीमसाठी वेगळा गुन्हा
समाजवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी चारचाकी वाहनातून लोखंडी, लाकडी रॉड आणले होते. त्यामुळे नदीम मलिकविरुद्ध कलम 37/1 प्रमाणे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला. नदीम यालाही जामीन देण्यात आला आहे.